'खान यूनिस का कसाई' होता तरी कोण?

    दिनांक :18-Oct-2024
Total Views |
गाझा, 
Butcher of Khan Yunis इस्रायलने गाझामध्ये हमास प्रमुख याह्या सिनवार यांच्या हत्येला दुजोरा दिला आहे. सिनवार हा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू झाले. इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड यादीत याह्या सिनवार हा टॉपवर होता. याह्या सिनवारच्या हत्येने हमासला मोठा धक्का बसला आहे. मात्र, याह्या सिनवारच्या हत्येला हमासकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. इस्रायली लष्कराने डीएनए आणि इतर चाचण्यांनंतर सिनवारच्या मृत्यूची पुष्टी केली. सिनवारचा जन्म 1962 मध्ये गाझा शहरातील खान युनिस येथील निर्वासित छावणीत झाला. त्यांचे पूर्ण नाव याह्या इब्राहिम सिनवार आहे. 1987 मध्ये स्थापन झालेल्या हमासच्या सुरुवातीच्या सदस्यांपैकी ते होते. 1989 मध्ये वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी सिनवार यांच्यावर दोन इस्रायली सैनिकांची हत्या केल्याचा आरोप होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. 2011 मध्ये कैदी अदलाबदलीमध्ये त्याची सुटका झाली होती. सिनवार त्याच्या क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध होता. त्याने 12 संशयित साथीदारांची हत्या केली आणि त्यानंतर तो खान युनिसचा कसाई म्हणून ओळखला जाऊ लागला.

kasaie 
 
 
सिनवार हा 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता आणि इस्रायलने गाझामधील काउंटर ऑपरेशनच्या सुरुवातीपासूनच त्याला संपवण्याची शपथ घेतली होती. संपूर्ण युद्धात, सिनवार कधीही सार्वजनिकरित्या दिसला नाही. सिनवार हा गाझा पट्टीमध्ये अनेक वर्षांपासून हमासचा सर्वोच्च नेता होता, त्याने त्याची लष्करी शाखा तयार केली होती आणि त्याच्याशी जवळचा संबंध होता. Butcher of Khan Yunis जुलैमध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्रायली हल्ल्यात इस्माईल हानिया मारला गेल्यानंतर सिनवार यांची गटाचा सर्वोच्च नेता म्हणून निवड करण्यात आली. इस्रायलने हमासच्या लष्करी शाखेचा प्रमुख मोहम्मद देईफ याला हवाई हल्ल्यात ठार केल्याचा दावाही केला होता, मात्र तो बचावला असल्याचे हमासने म्हटले आहे. इस्रायली सैन्याने उत्तर गाझा येथील जबलिया निर्वासित छावणीवर एक आठवड्याहून अधिक काळ हवाई आणि जमिनीवर हल्ले सुरू ठेवले आहेत. हेही वाचा : नेतन्याहू म्हणाले...उद्या युद्ध संपणार!
 
जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, याह्या सिनवारच्या जवळचे लोकही त्याला घाबरत होते. त्याला 'नाही' ऐकायची सवय नव्हती. अहवालात केलेल्या दाव्यानुसार, Butcher of Khan Yunis जर एखाद्या व्यक्तीने सिनवार यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांनी नेमून दिलेले काम केले नाही, तर तो त्या व्यक्तीला जिवंत गाडून टाकेल. सनवारवर 2015 मध्ये हमास कमांडर महमूद इश्तीवीचा छळ करून हत्या केल्याचाही आरोप होता. सिनवारचा बहुतेक वेळ हमासच्या बोगद्यात गेला. या बोगद्यांमध्ये बसून तो हमासच्या सैनिकांना कमांड देत असे.