...आता शंखनाद झाला आहे!

18 Oct 2024 05:00:42
प्रासंगिक 
 
 
- मोरेश्वर बडगे
Pawar-Thackeray-Maharashtra महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक आहे आणि २३ तारखेला निकाल हाती येतील. सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडींमध्ये होणार्‍या या बहुपक्षीय निवडणुकीकडे महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचेही लक्ष लागलेले आहे. Pawar-Thackeray-Maharashtra महाराष्ट्राची निवडणूक या आधी कधीही चुरशीची झालेली नव्हती. यंदा राजकारण तर आहेच; सामाजिकदृष्ट्या कप्पे-कंगोर्‍यांची म्हणून या निवडणुकीबद्दल प्रचंड उत्सुकतादेखील आहे. अनेकांच्या राजकीय अस्तित्वाचा निकाल लावणारी ही निवडणूक असेल. या निवडणुकीत युती-आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिलेला नाही. चेहरा मागणारे उद्धव ठाकरे सध्या हार्ट पेशंट आहेत. त्यामुळे ठाकरे प्रचाराच्या रणधुमाळीत उतरण्याची शक्यता कमीच आहे. Pawar-Thackeray-Maharashtra शरद पवार जुन्या नेत्यांच्या शोधात वणवण फिरताहेत. राहिला काँग्रेसचा प्रश्न. हरयाणात लागलेल्या शॉकमधून काँग्रेसला अजून स्वत:ला सावरता आलेले नाही. महायुतीशी दोन हात करायला मैदानात आहे कोण?
 
 
 

Pawar-Thackeray-Maharashtra 
 
 
 
विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्याच्या जेमतेम तीन दिवस आधी निकाल लागणार आहेत. त्यामुळे नवे सरकार स्थापन करण्यासाठी केवळ तीन दिवस मिळू शकतील. गेल्या वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वादळे आली. भाजपा आणि शिवसेना युतीने गेली निवडणूक जिंकली होती. Pawar-Thackeray-Maharashtra मात्र, निकालानंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर बसले. आता उद्धव त्यांच्या पायाशी आहेत तो भाग वेगळा. अडीच वर्षांतच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन बाहेर पडले. भाजपाने शिंदेंकडे देऊन महायुतीचे सरकार बनवले. दीड वर्षापूर्वी अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या विरोधात बंड केले. अजितदादाही महायुतीत आले. त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. दोन-दोन बंड महाराष्ट्राने पाहिले. राजकारणाची पातळी प्रचंड खालावली. नवनव्या शिव्या ऐकायला मिळाल्या.
 
 
 
Pawar-Thackeray-Maharashtra सामान्य माणूस या वातावरणाला कंटाळला आहे. सोबत लढायचे, नंतर फोडाफोडी करायची, कसेही करून मिळवायची या मानसिकतेचा लोकांना वीट आला आहे. मतदानाचा पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही. सरळ, सभ्य, प्रामाणिक राजकारणी लोकांना आवडत नाहीत का? आवडत असेल तर राजकारणाचा सध्याचा माहोल बदलण्याची संधी या निवडणुकीने चालत आली आहे. भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या घोषणेचे ‘शंखनाद’ या शब्दात स्वागत केले आहे. Pawar-Thackeray-Maharashtra हा आहे स्वार्थी, ढोंगी, नाटकी राजकारण्यांच्या विरोधात. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी ‘फेक नॅरेटिव्ह’ चालवला. देशाची घटना बदलवण्यासाठी नरेंद्र मोदींना चारसो पार जागा हव्या आहेत, असा प्रचार केला. आता महायुती सरकारने आणलेल्या योजनांची टिंगलटवाळी चालवली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून सरकारने महिलांना दरमहा १५०० रुपये पाठवणे सुरू केले आहे. तुम्ही लिहून घ्या ही एकटी योजना महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत पोहोचवणार आहे.
 
 
 
Pawar-Thackeray-Maharashtra सरकारने मुंबई प्रथमच टोलमुक्त केली आहे. या एका निर्णयाने ठाकरे सेनेला मुंबईमध्ये एखादी जागा जिंकतानाही दमछाक होणार आहे. पण विरोधकांची पोटदुखी वेगळी आहे. तिजोरी रिकामी केली अशी आदळआपट त्यांनी चालवली आहे. विरोधक किती गोंधळले आहेत, याचा हा नमुना आहे. रिकामी तिजोरी विरोधकांना मिळणार असेल तर शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्वासन ते कसे देत आहेत? आम्ही सत्तेत येताच या सरकारच्या सगळ्या योजना रद्द करू, असे उबाठाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सांगितले. उद्धव ठाकरे यांची ख्याती मुळातच ‘स्थगिती मुख्यमंत्री’ अशी राहिली आहे. मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेच्या आरे शेडच्या कामाला ठाकरेंनी स्थगिती होती. शिंदे सरकारने ती उठवली आणि आज मेट्रो तिकडे धावताना दिसते आहे. Pawar-Thackeray-Maharashtra त्यामुळे आता लोकांनी निर्णय करायचा आहे. स्थगिती सरकार आणायचे की मजबूत गतिमान सरकार आणायचे? एक सांगू का? लोकांचा निर्णय झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा महायुतीला बुडवेल, असा मोठा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे.
 
 
 
मनोज जरांगे पाटील गेली काही वर्षे मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन चालवत आहेत. जरांगे पाटील कोणाच्या इशार्‍यावर काम करीत आहेत, हे आता त्यांचेच लोक सांगत आहेत. फडणवीस यांच्या विरोधात जरांगे आग ओकतात. मात्र, शरद पवारांच्या विरोधात एक शब्द काढत नाहीत. Pawar-Thackeray-Maharashtra याचा अर्थ स्पष्ट आहे. मराठ्यांना तसे आरक्षण कायद्याने देता येत नाही, दिले तर कोर्टात रद्द होईल हे नीट ठावूक असताना जरांगे का हट्टाला पेटले आहेत? आता ते बाहेर येत आहे. २० तारखेला मराठा समाजाची बैठक आहे. त्यात लढायचे की पडायचे, याचा निर्णय होईल. निर्णय काय होणार? जो व्हायचा, तो आधीच ठरला आहे. मला शरद पवारांचे आश्चर्य वाटते. स्वत:च्या मुलीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री नादात किती वाहवत गेले आहेत शरद पवार? पवार यांचे वय आज ८४ वर्षे आहे. पण आपण ९० व्या वर्षापर्यंत थांबणार नाही, असे नुकतेच ते बोलले. महाराष्ट्राचा चेहरामोहरा मला बदलायचा आहे, असे पवार म्हणाले. मग गेली ६० वर्षे चलती होती तेव्हा पवारांनी काय आलू छिलले?
 
 
 
 
Pawar-Thackeray-Maharashtra आता चेहरामोहरा बदलणार म्हणजे महाराष्ट्राला ब्युटी पार्लरमध्ये नेणार? भंकसगिरी आहे. स्वतःचा सांगता येईल असा या पवारांचा एकही ड्रिम प्रोजेक्ट नाही. महायुतीचे लोक काही करताहेत तर त्याबद्दलही त्यांना असूया आहे. आतली गोष्ट सांगतो. उद्धव ठाकरे आता शरद पवारांच्या मनातून उतरले आहेत. पवारांना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचे दाखवून गेम केला. मात्र, आता शरद पवार उद्धव यांना मोजायला तयार नाहीत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा महाविकास आघाडीने जाहीर करावा, असा हट्ट उद्धव यांनी खूप लावून धरला. पण शरद पवारांनी भीक घातली नाही. कसे घालतील? थोरल्या काकांचा अजेंडा काही वेगळा आहे. आता त्यांच्यासोबत फारसे कोणी उरलेले नाही. Pawar-Thackeray-Maharashtra म्हणून बाहेरचा रिजेक्टेड माल दिवस त्यांच्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे हे फार चमत्कार करू शकत नाहीत.
 
 
 
आता तर अँजिओप्लास्टी झाली. तब्येतीची बंधने आली आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना जास्तीचा घसा कोरडा करावा लागणार आहे. कालपर्यंत उद्धव सहानुभूतीचे कार्ड चालवत होते. आता कुठले कार्ड आहे त्यांच्याकडे? शरद पवारांच्या हातात खेळणे एवढेच उद्धव यांच्यासाठी उरले राजकीयदृष्ट्या उद्धव म्हणा की शरद पवार म्हणा, दोघेही संपले आहेत. विरोधक चेहरा देऊ शकले नाहीत. महायुतीकडे तो आधीपासून आहे. Pawar-Thackeray-Maharashtra या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस महायुतीचा चेहरा म्हणून जोरदारपणे पुढे येतील. दुसरा आहे कोण? भाजपाची ती रणनीती आहे. ज्या पद्धतीने महायुतीच्या प्रचार मोहिमेची आखणी दिसते, जाहिरातींमध्ये फडणवीस यांनाच फोकस केले जात आहे,  त्यावरून हे स्पष्ट होते. आता भाजपाचा रथ कोणी रोखू शकत नाही.
Powered By Sangraha 9.0