आप महाराष्ट्रात निवडणूक लढणार

    दिनांक :19-Oct-2024
Total Views |
सिंधुदुर्ग, 
इंडिया आघाडीत घटक पक्ष असलेल्या Aam Aadmi Party आम आदमी पार्टीला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवायची असून, महाविकास आघाडीच्या काेट्यातून काही जागा मिळाव्या, अशी अपेक्षा या पक्षाने व्यक्त केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँगे्रस आणि शरद पवार गट यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपावरून मतभेद उाळून आले आहेत. जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचण्यासाठी या घटक पक्षांमध्ये लाथाळ्या सुरू असताना आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही मविआकडे काही जागा मागण्याचे ठरविले असल्याने, आघाडीत आणखी बिघाडी हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, अखिलेश यादव यांच्या सपानेही या आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे.
 
 
aap d
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाल येथे पत्रपरिषदेत बाेलताना Aam Aadmi Party आपचे गाेवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर म्हणाले की, आम्हाला काेकणात विशेषत: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाचा पाया मजबूत करायचा आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राच्या काेल्हापूर जिल्ह्यातही प्रवेश करण्यासाठी आम्ही इच्छुक आहाेत. आम्हाला काेकणात चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथील नागरिक भाजपाला पर्याय म्हणून आमच्याकडे पाहात आहेत तसेच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सूडबुद्धीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे, असे पालेकर म्हणाले.