सरकारी निर्णय, महामंडळाच्या नियुक्त्यांवर स्थगिती

    दिनांक :19-Oct-2024
Total Views |
- निवडणूक आयाेगाचा आदेश जारी

मुंबई, 
Appointment of Corporation President आचार संहिता लागल्यावर जे निर्णय घेण्यात आले, ते मतदान आणि मतदारांवर प्रभाव टाकू शकतात, असे निदर्शनास आल्यानंतर, वैधानिक मंडळे आणि महामंडळांच्या स्थापनेशी संबंधित असलेले विविध सरकारी विभागांनी काढलेले 110 परिपत्रक आणि निविदा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे त्यावरील नियुक्त्यांनाही स्थगिती देण्यात आल्याचे आता समाेर येत आहे.
 
 
Election Commission
 
15 ऑक्टाेबर राेजी निवडणुकीची घाेषणा झाली. त्याच वेळी महायुतीतील जवळपास 27 नेत्यांची Appointment of Corporation President महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली हाेती. नियमानुसार या नियुक्त्या लागू हाेऊ शकत नाहीत. याबाबतची तक्रार विराेधी पक्षांनी निवडणूक आयाेगाकडे केली हाेती. त्यानंतर याबाबतचा अहवाल मागवण्यात आला हाेता. त्यानंतर यातील काही निर्णय थेट मतदारांना प्रभावित करणारे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ते निर्णय रद्द करण्यात आले आहेत. शिवाय महामंडळांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
 
 
Appointment of Corporation President एकीकडे परिपत्रक आणि निविदा रद्द हाेत असताना राजकीय नियुक्त्यांनाही ब्रेक लागला आहे. निवडणुकीच्या ताेंडावर नाराजांना शांत करण्यासाठी महामंडळाच्या नियुक्त्या करण्यात आल्या हाेत्या. पण, महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याचा आनंद व्यक्त करण्याआधीच ते पद हातून निसटले. राज्याच्या याेजना घराघरांत पाेहाेचविण्यासाठी मुख्यमंत्री दूत ही संकल्पना पुढे आणली हाेती. त्या संकल्पनेलाही ब्रेक लावण्यात आला आहे.