तू इथला नाहीस, परत जा, तू काळा आहेस

19 Oct 2024 13:37:44
Mistreatment of Indians in Canada भारत आणि कॅनडामधील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. दोन्ही देशांमधील संबंध कधी सुधारतील हे सांगणे कठीण आहे.असे असूनही, कॅनडामध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात आणि आपलं जीवन जगत आहेत. हे देखील एक सत्य आहे.तरीही या बिघडत चाललेल्या संबंधांदरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅनडामध्ये एका भारतीय व्यक्तीशी गैरवर्तन केले जात आहे आणि वर्णद्वेषी टिप्पणी केली आहे.
 

canada
 
 
 कॅनडामधील Mistreatment of Indians in Canada आपला अनुभव सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव अश्विन अन्नामलाई आहे. त्याच्या पोस्टमध्ये, तो सांगतो की,त्याला एकदा कॅनडामध्ये वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. यासंदर्भातील एक व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला आहे. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओबद्दल बोलताना तो म्हणाला, की, तो वॉटरलू, ओंटारियोमध्ये फिरत असताना एका वृद्ध महिलेने त्याच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केली.
अन्नामलाई सांगतात की, ते गेल्या सहा वर्षांपासून कॅनडात राहत आहेत आणि आता त्यांनी तिथलं नागरिकत्वही मिळवलं आहे. व्हिडिओमध्ये अण्णामलाई त्या वृद्ध महिलेला आपण कॅनडाचे नागरिक असल्याचं सांगत असल्याचं दिसतंय, पण त्या महिलेने ते मान्य केलं नाही. अन्नामलाईने तिला विनम्रपणे समजावून सांगितले की, तिने वर्णद्वेषी वर टिप्पणी करू नये आणि तिला सांगितले की तो देखील तुमच्यासारखाच कॅनेडियन आहे, तर त्या महिलेने तिच्या इंग्रजी उच्चारावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. याशिवाय अण्णामलाई यांच्या त्वचेच्या रंगावरही महिलेला आक्षेप होता आणि तिने त्याला येथून निघून जाण्यास सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0