पवारांवर ताेफ डागणारे राजेंद्र शिंगणे तुतारी फुंकणार!

    दिनांक :19-Oct-2024
Total Views |
मुंबई, 
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि राज्यात राजकीय घडामाेडींना वेग आला. मतदारसंघाचे तिकीट मिळेल तिकडे नेते धावू लागले. सर्वच पक्षात इच्छुकांची माेठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक नेते वेगवेगळ्या पक्षांत प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Rajendra Shingane डाॅ. राजेंद्र शिंगणे हे घरवापसी करणार आहे. ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
 
 
Rajendra Shingane
 
नुकतीच Rajendra Shingane राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याची घाेषणा केली हाेती. गायत्री यांनी याबाबत शरद पवार यांची भेट घेऊन राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली हाेती. मात्र, आता शिंगणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिंगणे यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाताे.
 
 
मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी राजेंद्र शिंगणे यांनी चार दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला हाेता. राज्यात अनेक नेत्यांना घरातूनच विराेध झालेला आहे. त्यामुळे लाेकशाहीत सर्वांना ताे अधिकार आहे. आगामी काळात काेणाला किती विराेध हाेताे, हे दिसेलच असेही शिंगणे म्हणाले. माझी आणि शरद पवारांची भेट झाली नाही. मात्र, मी जयंत पाटलांना भेटल्याचे शिंगणे यांनी सांगितले हाेते. मी जायचे तर उघडपणे जाईल, चेहऱ्यावर फाईल लपवून जाणार नाही. त्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्या गाडीत मी नव्हताेच, असा खुलासा देखील शिंगणे यांनी केला हाेता. आगामी निवडणूक ही शरद पवार यांच्या गटाकडून तुतारी चिन्हावर लढवावी, असे 99 टक्के कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे वक्तव्य शिंगणे यांनी केले हाेते. 1995 पासून मी राजकारणात आहे. त्यापूर्वीही माझ्या वडिलांचे आणि शरद पवार यांचे संबंध चांगले हाेते, असे Rajendra Shingane राजेंद्र शिंगणे म्हणाले हाेते.