समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या पाेस्ट हटवा

19 Oct 2024 21:26:18
- राज्य निवडणूक आयाेगाची सूचना
 
मुंबई, 
State Election Commission : मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या बाेगस बातम्या आणि दिशाभूल करणाऱ्या पाेस्ट सर्व समाजमाध्यम मंचावरून तातडीने हटविण्यात याव्यात, अशा सूचना राज्य निवडणूक आयाेगाने दिल्या आहेत. अशा एकूण 1,752 बाेगस बातम्या आणि पाेस्ट सध्या विविध समाजमाध्यमांवर चालविल्या जात आहेत. आयाेगाने आदेश दिल्यानंतर काही तासांतच अशा 300 पाेस्ट हटविण्यात आल्या. मात्र, अजूनही 1,752 पाेस्ट स्पष्टपणे दिसत असून, त्या तत्काळ हटविण्यात याव्या, असे आयाेगाने म्हटले आहे.
 
 
State Election Commission
 
State Election Commission : यासाठी आयाेगाने माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत या समाजमाध्यमांना नाेटीसही जारी करण्यात आली आहे. आयाेगाची नाेटीस मिळाल्यानंतर फेसबुकने 16 पाेस्ट हटविल्या असून, 127 पाेस्ट कायम आहेत. त्याचप्रमाणे इन्स्टाग्रामने 29, समाजमाध्यम मंच एक्सने 251 आणि युट्यूबने 5 पाेस्ट हटविल्या आहेत. दरम्यान, आयाेगाच्या सी-व्हिजील अ‍ॅपवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 420 तक्रारी प्राप्त झाल्या असून, यातील 414 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यातील सर्वाधिक तक्रारी ठाण्यातून आल्या आहेत, अशी माहिती आयाेगाने दिली.
Powered By Sangraha 9.0