वादग्रस्त जागेवरील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा प्रशासनाने हटविला

*जागेची परवानगी प्राप्त करण्याच्या सुचना

    दिनांक :19-Oct-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
गिरड, 
Statue of Annabhau Sathe : येथील मातंग समाज बांधवांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला होता. मात्र, विना परवानगी पुतळा बसविल्याने यासंबंधी तक्रार केली होती. शेवटी प्रशासनाकडून मातंग समाज बांधवांना रितसर या जागेवर परवानगी घेऊन पुतळा बसवावा यासाठी वेळ दिला होता. मात्र, मातंग समाज बांधवांकडून अद्याप कोणतीही परवानगी न आल्याने शेवटी रात्रीच्या सुमारास प्रशासनाकडून हा पुतळा हटविण्यात आला आहे.
 
 
 
GIRAD
 
 
पुतळा बसविण्याचा वाद काही महिन्यांपासून सुरूच होता. पुतळा बसविताना कोणतीही प्रशासकीय परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे जागेची परवानगी प्राप्त केल्यानंतरच हा पुतळा बसवावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पुतळा हटविताच मातंग समाज बांधव चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी प्रशासनाकडून त्यांची समजूत काढून त्यांना रितसर परवानगी आणा व पुतळा बसवावा, अशी समज दिली.
 
 
पुतळ्याच्या परवानगीचे प्रकरण प्रशासकीय पातळीवर कार्यान्वित होते. गावात शांततापूर्ण वातावरण असताना प्रशासनाने पुतळा हटवून आचारसंहितेचा खर्‍या अर्थाने भंग केला. समाज भावना दुखावल्या, अश्या शब्दात फकिरा खडसे, दिलीप पोटफोडे, अमोल खंडाळे यांनी खंत व्यक्त केली.