मुस्लिम नेत्यांचा व्हाेट जिहादचा ऐलान

19 Oct 2024 19:09:07
- महायुतीविराेधात ठाकरे गटाचे षडयंत्र
- भाजपाने केली चाैकशीची मागणी

मुंबई, 
Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर महाराष्ट्रातील विशिष्ट समुदायाच्या मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी राज्यात धार्मिक तेढ वाढवून राजकीय फायदा मिळविण्याचे षडयंत्र सुरू असून, यास काेणत्या नेत्यांची फूस आहे, याची चाैकशी करावी, अशी मागणी प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीस मतदान करणारा मुस्लिम नव्हेच, अशा शब्दांत महायुतीच्या विराेधात धार्मिक विखार पेरणाऱ्या एका धर्मगुरूचा व्हिडीओ समाजमाध्यमांवरून सर्वत्रफैलावला असताना, व्हाेट जिहाद या विखाराचा आणखी काेणता नवा पुरावा निवडणूक आयाेगास हवा, असा सवाल उपाध्ये यांनी केला.
 
 
Uddhav Thackeray 1
 
वाेट जिहाद हा काल्पनिक प्रकार नसून विशिष्ट धार्मिक समुदायास महायुतीच्या विराेधात मतदान करण्याकरिता धार्मिक बाबींना पुढे करून धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचे लाेकसभा निवडणुकीतच समाेर आले हाेते. अशा वाेट जिहादी संकल्पनेमुळे महाराष्ट्रातील 48 लाेकसभा मतदारसंघांपैकी किमान 14 मतदारसंघांत वाेट जिहादचा प्रभाव दिसून आल्याने, या समुदायाच्या मतदारांनी हिंदुत्ववादी विचाराच्या उमेदवारांच्या विराेधात जाणीवपूर्वक मतदान केले, हा वाेट जिहादचाच प्रकार हाेता. अशा प्रकारास फूस लावण्यासाठी महायुतीच्या विराेधातील काही राजकीय नेत्यांनी विशिष्ट समुदायांच्या नेत्यांशी हातमिळवणी केली असून, त्या समुदायाच्या धार्मिक हितरक्षणाची आश्वासने देऊन त्यांना युतीविराेधी मतदानास भाग पाडले, असा आराेपही त्यांनी केला. अगदी अलीकडे, मुस्लिम समुदायाच्या एका नेत्याने मुस्लिमांना महायुतीच्या विराेधात मतदान करण्याचा जाहीर आदेश दिल्याची ध्वनिचित्रीत समाेर आल्याने व्हाेट जिहादचे राजकीय षडयंत्र स्पष्ट झाले, असे सांगून उपाध्ये यांनी ती ध्वनिीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना ऐकविली.
 
लाेकसभा निवडणुकांच्या आसपास मुस्लिम मतांचे एकगठ्ठा एकत्रिकरण करण्यासाठी उबाठा तसेच शरद पवार गटाचे नेते सक्रिय झाल्याची शंका व्यक्त हाेत हाेती. उबाठा गटाचे नेते Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी तर मुस्लिम समुदायाच्या नेत्यांचा पाहुणचार करून, सीएए कायदा अंमलात येणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्याचा आराेपही उपाध्ये यांनी केला.
Powered By Sangraha 9.0