विकसित महाराष्ट्रासाठी हाेणार लाखाे कल्पनांचे संकलन

19 Oct 2024 19:39:58
- भाजयुमाेचे अनाेखे अभियान

मुंबई, 
माेदी सरकार विकसित भारत 2047 या ध्येयाकडे वाटचाल करीत असताना तरुणांच्या कल्पना, आकांक्षा जाणून घेण्यासाठी भारतीय जनता युवा माेर्चार्ते राज्यातील तरुणांशी थेट संपर्क साधण्याचे अनाेखे अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पुढील 25 दिवसांत जिल्हा स्तरावर 50 हजारांहून अधिक कार्यक्रम आयाेजित करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस व युवा माेर्चाचे प्रभारी Vikrant Patil आ. विक्रांत पाटील यांनी दिली.
 
 
Vikrant Patil
 
विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ अभियानाचा प्रारंभ केला. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील तरुणांच्या सूचना एकत्रित करणे आणि विकसित महाराष्ट्रासाठी त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकाेन संकलित करणे हे आहे. या अभियानातून मिळालेल्या कल्पना आणि सूचनांमुळे विकसित भारताच्या राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने विकसित महाराष्ट्राचा पाया तयार हाेईल. उज्ज्वल भविष्यासाठी, युवा सक्षमीकरण, सशक्त, शाश्वत आणि यशस्वी महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांच्या कल्पना, दूरदृष्टी आणि सूचनांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे, असे Vikrant Patil विक्रांत पाटील यांनी सांगितले.
 
 
या माेहिमेद्वारे संपूर्ण प्रचार कार्यकाळात दीड काेटी सूचना गाेळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तसेच तळागाळातील लाेकांपर्यंत पाेहाेचण्यासाठी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बूथपर्यंत माेहीम पाेहाेचवण्यासाठी एक लाखाहून अधिक बैठका आयाेजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील तरुण अनेक व्यासपीठांवर त्यांच्या सूचना, कल्पना सादर करू शकतात.
Powered By Sangraha 9.0