काेपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे-काेल्हेंचा राजकीय संघर्ष

    दिनांक :19-Oct-2024
Total Views |
- विवेक काेल्हे तुतारी घेणार की मशाल?
 
अहल्यानगर, 
उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत आल्यानंतर भाजपातील राजकीय परिवाराची राजकीय काेंडी झालेला मतदारसंघ म्हणजे काेपरगाव विधानसभा मतदारसंघ. काळे आणि काेल्हे ही पारंपरिक लढाई असलेला काेपरगाव विधानसभा मतदारसंघ असून, यावेळी दाेघेही महायुतीत असल्याने उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आशुताेष काळे यांनी आपली उमेदवारी गृहीत धरत निवडणुकीला सामाेरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता काेल्हे आणि Vivek Kolhe विवेक काेल्हे हे अद्याप कुठलाही निर्णय घेऊ शकले नाहीत.
 
 
Vivek Kolhe
 
काही महिन्यांपूर्वी Vivek Kolhe विवेक काेल्हे यांनी शरद पवार यांच्या गाडीतून एकत्र प्रवास केल्याने तुतारी हाती घेण्याची चर्चा रंगली हाेती. विवेक काेल्हे यांच्यासमाेर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हे दाेन पर्याय आहेत. यातील काेणता पर्याय ते निवडणार? हे आगामी काळात स्पष्ट हाेईल. शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांचेही नाव चर्चेत असून, उद्धव ठाकरे गटाकडून राजेंद्र झावरे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यावेळी काेपरगाव विधानसभेत काळे विरुद्ध काेल्हे लढत झाली, तर काेल्हे हाती तुतारी घेणार की मशाल, हे पाहणे महत्त्वाचे असेल.
शेती पाण्याचा प्रश्न कायम
येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असला, तरी शेती पाण्याचा प्रश्न विधानसभेतील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायदा यावर या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चर्चा हाेणार आहे. आता काेल्हे नेमके काेणत्या पक्षात जाणार? की ते निवडणुकीतून माघार घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.