अन् मग मी अखेरचा श्वास घेईन

19 Oct 2024 15:26:01
srk want to die film बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. शाहरुख खानचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. शाहरुखला या यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे. त्यानं एका मुलाखतीत सांगितलं की,शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणार आणि त्याची इच्छा आहे की त्यानं त्याचा शेवटचा श्वास हा चित्रपटाच्या सेटवरच घ्यायला हवा. शाहरुखनं हे मान्य केलं की, अभिनयाच्या माध्यमातून तो त्याचं आयुष्य खूप एन्जॉय करतो आणि त्याला लोकांचं मनोरंजन करायला खूप आवडतं.
 srk
 
शाहरुख खाननं srk want to die film ही मुलाखत यूट्यूब चॅननला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं त्याचे विचार आणि भविष्यातील प्लॅनिंगविषयी देखील सांगितलं आहे. याच फिल्म फेस्टिवलमध्ये शाहरुखला लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार देत सन्मानित करण्यात आलं. मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं की, 'त्याला कायम अभिनया करायचा आहे का?' शाहरुख खान म्हणाला, 'मला कायम अभिनय करायचा आहे का? तर हो, जोपर्यंत मी शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत मला अभिनय करायचा आहे, माझ्या आयुष्यात एकच स्वप्न आहे की कोणी अक्शन म्हणेल आणि मग मी अखेरचा श्वास घेईन. ते कट म्हणतील आणि त्यानंतरही मी उठत नाही. आता हे संपल, प्लीज. मी म्हणतो, नाही. जोपर्यंत ते सगळे बोलत नाही की सीन अगदी योग्य झाला आहे. हो मला कायम अभिनय करायचा आहे.'
शाहरुख खाननं srk want to die film सांगितलं की 'जसं लोकं समजतात, तसा तो गंभीर अभिनेता नाही. त्यानं सांगितलं की जर मी दोन मिनिटांसाठी मनोरंजन करू शकतो, तर हे प्रेम आहे. जर मी कोणाला ५ ० वर्ष प्रेम करु शकतो तर हे मनोरंजन आहे. जर मी कोणाचं ३ ० सेकंदासाठी मनोरंजन करु शकतो तर ही क्रिएटिव्हिटी आहे. त्यामुळे मी एकाच गोष्टीसाठी वेगवेगळी नाव शोधत असतो आणि मला हा आनंद शेअर करण्यास खूप मज्जा येते. ज्यामुळे लोकानं एक तास किंवा त्यापैकी जास्त वेळ त्या गोष्टीची आठवण राहते आणि ते त्याचा आनंद घेतात.'
Powered By Sangraha 9.0