भाजपाच्या पहिल्या यादीत मुंबईतील १४ उमेदवार

20 Oct 2024 19:01:28
मुंबई, 
BJP's candidates from Mumbai भाजपाने पहिल्या यादीत मुंबईतील ३६ पैकी १४ विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. या १४ पैकी बहुतांश विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली असून, विनोद शेलार यांना नव्याने मलाड पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.
 
 
bjp mum
 
भाजपाने विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली असून, यात एकूण ९९ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत मुंबईतील ३६ पैकी १४ मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासह विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, अतुल भातखळकर, योगेश सागर, राम कदम, पराग अळवणी, तमिल सेल्वन, कालिदास कोळंबकर, विद्या ठाकूर, मिहिर कोटेचा, मनिषा चौधरी आणि अमित साटम या विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीत समावेश आहे. मात्र, वर्सोवाच्या विद्यमान आमदार डॉ. भारती लव्हेकर, बोरीवलीचे आमदार सुनील राणे तर, घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह याची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर झालेली नाही.
 
 
BJP's candidates from Mumbai या तीन नावांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते की, हे मतदारसंघ मित्र पक्षांना सोडली जातात, हे येत्या काळात कळेल. मात्र, विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ भाजपा सोडणार नाही. त्यामुळे येथे भाजपाच लढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजपा ३६ पैकी १८ जागांवर भाजपा लढेल, अशी शक्यता वर्तवली जात असताना, आता १४ मतदारसंघात उमेदवार जाहीर केली असून, वर्सोवा, बोरीवली आणि घाटकोपर पूर्व या मतदारसंघात विद्यमान आमदार असल्याने येथेही भाजपा निवडणूक लढवेल. त्यामुळे सद्यस्थितीत भाजपा १७ जागा निश्चितच लढेल, यावर शिक्कामोर्तब झाले असून, एखाद-दोन जागा अधिकच्या लढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
Powered By Sangraha 9.0