इस्रायलचे बैरूत, गाझावर भीषण हवाई हल्ले, ७३ ठार

    दिनांक :20-Oct-2024
Total Views |
- नेतान्याहू यांच्या हत्येच्या प्रयत्नानंतर हल्ले तीव्र
 
तेल अवीव, 
Israel attacks Beirut इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या हैफा येथील सीझेरिया येथील निवासस्थानाजवळ शनिवारी ड्रोनचा स्फोट झाला. यानंतर आता इस्रायलने लेबनॉन आणि गाझावरील हवाई हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायलने शनिवारी अनेक घरे आणि बहुमजली निवासी इमारतींवर केलेल्या हवाई हल्ले सुरू केल्यानंतर डॉक्टरांसह सुमारे ७३ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा दहशतवादी संघटना हमासने केला आहे.
 
 
berut
 
शनिवारी उत्तर गाझामधील बीट लाहिया शहरातील अनेक घरे आणि बहुमजली निवासी इमारतीवर हवाई हल्ला करून नेतान्याहू यांच्या हत्येच्या प्रयत्नाला इस्रायलने प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात डॉक्टरांसह किमान ७३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हमासच्या माध्यमांनी दिली आहे. इस्रायलने मृतांचा आकडा हा अतिशयोक्ती असल्याचे म्हटले आहे. आमचा हल्ला अचूक होता आणि हमास नष्ट करणे हाच आमचा उद्देश होता, असा पुनरुच्चार केला आहे. दरम्यान, गाझाच्या नागरी संरक्षण एजन्सीने म्हटले की, इस्रायली लष्करी कारवाईत दोन आठवड्यांत गाझाच्या उत्तर भागात ४०० पेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत.
 
 
Israel attacks Beirut गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ४२ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. स्थानिक आरोग्य अधिकाèयांच्या मते, यात निम्म्याहून अधिक महिला आणि मुले आहेत. इस्रायलने लेबनॉनच्या काही भागांतील लोकांना इमारती आणि गावे सोडून जाण्यासाठी जवळपास दैनंदिन चेतावणी जारी केली आहे. या लढाईमुळे सुमारे चार लाखांहून अधिक अधिक लोक विस्थापित झाले आहेत. ऑक्टोबर २०२३ पासून लेबनॉनमध्ये २,४०० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत.