इंडोनेशियाचे आठवे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो

    दिनांक :20-Oct-2024
Total Views |
जकार्ता, 
Prabowo Subianto प्रबोवो सुबियांतो यांनी रविवारी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुस्लिमबहुल इंडोनेशिया देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यांनी इंडोनेशियाच्या लष्करी हुकूमशाहीच्या काळोख्या काळात अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या माजी जनरलपासून राष्ट्रपतिपदापर्यंतचा खडतर प्रवास पूर्ण केला. माजी मंत्री प्रबोवो सुबियांतो हे गुरुवारी ७३ वर्षांचे झाले. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी पवित्र कुराण, खासदार आणि परदेशी मान्यवरांसमोर शपथ घेतल्यानंतर त्यांची रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली.
 
 
PRABOWO-SUBIANTO
 
Prabowo Subianto  इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, सौदी अरब, रशिया, दक्षिण कोरिया, चीन, ऑस्ट्रेलिया व सहकारी आग्नेय आशियाई राष्ट्रांसह ४० हून अधिक देशांतील नेते व वरिष्ठ अधिकारी जकार्ता येथील शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी आले होते. सुबियांतो हे प्रचंड लोकप्रिय राष्ट्रपती जोको विडोडो यांचे दीर्घकाळचे प्रतिस्पर्धी होते. सुबियांतो हे विडोडो यांच्या विरोधात दोन वेळा राष्ट्रपतिपदासाठी उभे राहिले. मात्र २०१४ व २०१९ मध्ये अशा दोन्ही वेळा त्यांचा पराभव स्वीकारावा लागला होता.