कर्मे इशू भजावा!

20 Oct 2024 05:45:00
संत प्रबाेधन
Saint Dnyaneshwar संतांनी आपल्याला कर्मातच ईश्वर पाहण्याचा संदेश दिला आहे. आपल्या हाती आज परमेश्वराने नाेकरी-व्यवसायाच्या निमित्ताने जे काम दिले आहे, त्या कामातच परमेश्वराला पाहणे हाच कर्मसिद्धांत आपल्या कर्तव्याला याेग्य न्याय देऊ शकताे. संत ज्ञानेश्वरांच्या ‘भावार्थ दीपिके’तील कर्म व विकर्माची धुसर रेषा याेग्य कर्मासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मानवी जीवनाला याेग्य दिशा व परिमाण प्राप्त हाेण्यासाठी विकर्म म्हणजे काय? विकर्मांचे खरे स्वरूप व विकर्मांबद्दल असणारे सामान्य माणसांचे गैरसमज यासाठी याेग्य दिशादर्शक आहे. कर्माला सत्य व सातत्यपूर्ण विकर्मांची जाेड दिल्यास मानवी वृत्तीमध्ये हाेणारा सकारात्मक बदल हा मानस पातळीवरील असल्याने मानवी जीवनाला ताे उपकारकच ठरलेला आहे.
 
 
Sant-Tukaram
 
विकर्म म्हणजे काय?
मानवाच्या कल्याणासाठी संतांनी सांगितलेली याेग्य कर्मे. त्या कर्मांच्या आधारे मानवाने आपल्या संपूर्ण जीवनप्रवासामध्ये याेग्य त्या कर्मांची निवड करून त्याद्वारे दैवी संपत्तीचे गुण अंगी बाणवून त्याप्रमाणे मार्गक्रमण करणे हाेय. असे सर्वच संतांना त्यांच्या कर्म श्रद्धा व साधनेने नमूद करावेसे वाटते. श्री ज्ञानेश्वरी व त्यातील विविध विकर्म व विशुद्ध कर्म जर निश्चिंत मनाने करावयाची असतील, तर त्यांना विकर्मांच्या स्वरूपातील याेग्य प्रमाणामध्ये वापरण्याची तयारी साधकाची असली पाहिजे. त्यामुळे वृत्ती निर्भय हाेईल व हातून सत्कर्मे घडतील. दिव्यत्वाच्या प्रचीतीसाठी ‘कर्मे ईशू भजावा’ असा दिव्य संदेश संत तुकारामांनी त्यांच्या ‘अभंग वाङ्मया’तून दिला आहे. कर्माला देव मानण्याची आपल्या भारतीय संस्कृतीमधील शिकवण ही अवघ्या जगामध्ये अद्वितीय आहे.
 
 
जया करणे आत्महित । स्वधर्म आचरावा सतत ।।
कर्मे नित्य नैमित्यिक । ब्रह्मप्राप्ती लागी देव ।।
तिचि नित्य आचरावी । चित्तशुद्धी तेणे व्हावी ।।
एका जनार्दनी कर्म । ईशभक्तीचे हे वर्म ।।
संत एकनाथांनी असे विकर्मांचे महिमान आपल्या एकनाथी भागवतातून मांडले आहे. त्यांना प्रत्येक याेग्य कर्मामध्ये ईश्वर भक्तीची आराधना वाटते. साधकाने चित्तशुद्धीसाठी विकर्म मार्गाचे पालन करावे. ‘कर्म तैसे फळ’ या सिद्धांतानुसार कर्माप्रमाणे \ळ हे मिळणारच आहे. गीता तत्त्वानुसार-
कर्मण्येवाधिकारस्ते । मा \लेशु कदाचन ।
मा कर्मेलहेतूभूर्मा ते संगाेस्त्वकर्माणि ।।
Saint Dnyaneshwar  : म्हणजेच नियत कर्म करीत राहावे. निष्काम बुद्धीने केलेले कर्माचरण हे सर्वश्रेष्ठ असून कर्माच्या \लाची आसक्ती नकाे. आत्मज्ञानाविषयीच्या संकल्पना संतांनी अगदी स्पष्ट मांडल्या आहेत. ज्ञानेश्वरीतील 13 व्या अध्यायातील संदर्भ समर्पक वाटताे. ब्रह्माची महती व ज्ञान ज्याला हाेते, ताे खरा ज्ञानी मानावा, असे संत ज्ञानेश्वर सांगतात. विश्वातल्या प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्मतत्त्व लुप्त आहे. याला ब्रह्मज्ञान म्हणतात. याचा अनुभव घेणे म्हणजेच आत्मज्ञान हाेय. या आत्मज्ञानामुळे माणसाला जगण्याची व्यापकता प्राप्त हाेते. संपूर्ण विश्वच ईश्वरतत्त्वाचा अंश असल्याची जाणीव हाेते.
 
 
जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ।।
त्यामुळे जगातील प्रत्येक वस्तू व जीव आपलाच बांधव असल्याची जाण वाढीस लागते. जसे
जे जे भेटे भूत । ते ते वाटे मी ऐसे ।।
विश्वात्मकतेचा भाव यातून प्रकट हाेताना दिसताे. सर्व संतांनी दीनदुबळ्यांची सेवा केली आहे. आपल्या कृतीतून त्यांनी तसा संदेश दिला आहे. मग एकनाथांचे मरणासक्त गाढवाला पाणी पाजणे असाे की नामदेवांची भुकेल्या कुत्र्याला पाेळी देणे असाे; की तुकारामांचे मुंग्यांना साखर घालणे असाे. त्या सर्वांनी एकच भाव प्रकट केला आहे, ताे म्हणजे प्राणिमात्रांविषयी सेवाभाव.
संत तुकाराम महाराज म्हणतात-
जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जाे आपुले
ताेचि साधु ओळखावा । देव तेथेची जाणावा ।।
 
 
Saint Dnyaneshwar  : सत्कर्म करण्यासाठी गुरुतत्त्वाच्या शक्तीशी एकरूप हाेण्याचा सिद्धांत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी मांडला आहे. सत्कर्मांची सेवा बहरली की, गुरू तुमच्याजवळ धावत येताे. तुम्हाला गुरू शाेधायची गरज नाही. तुमची निष्ठा प्रबळ पाहिजे. गुरू तुमच्याकडे धावत येईल. ताे आपल्या कर्तव्यतत्परतेत असताे. विकर्मांचे श्रेष्ठपण ज्ञानदेवांनी आपल्या गुरुनिष्ठेतून व्यक्त केले आहे. प्रत्येक विकर्मांचा धागा आपल्या पुस्तकात आपल्या पद्धतीने गुंफला आहे. विकर्मांच्या प्रत्येक धाग्यातून संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानविचार महत्त्वाचा आहे. त्यातून ते संदेश देतात की, प्रत्येक माणसाने आपले जीवनकार्य सात्त्विक ठेवावे. त्यातून सेवाभाव प्रकटावा. सेवेसाठी संकटांचा सामना करण्याची तयारी असली पाहिजे. प्रत्येक कर्म शुद्धभावाने केले तर जीवनात प्राप्त हाेणारा आनंद हा अवर्णनीय असताे. आज संपूर्ण जगाला सत्कर्म करणाऱ्यांची आवश्यकता आहे. सर्व जग अनाचाराच्या दुष्कर प्रवाहातून प्रवास करत आहे. अवघ्या जगाला आज संत विचारांची आवश्यकता आहे. विज्ञानयुगामुळे सर्व विश्व जवळ आले असले, तरी माणसांची मने मात्र एकमेकांपासून काेसाे दूर गेली आहेत. मन:शांती समाजमनातून हद्दपार झाली आहे. त्यामुळे सर्व जग अकर्मांच्या जाळ्यात अडकले आहे. त्या सर्वांना दिशा दाखविण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली विकर्मे अंगीकारण्याची आजच्या काळाची गरज आहे.
 
- प्रा. डाॅ. हरिदास आखरे
- 7588566400
 
Powered By Sangraha 9.0