साप्ताहिक राशिभविष्य

20 Oct 2024 06:00:00
 साप्ताहिक राशिभविष्य 
 
 
Rashi Bhavishy
 
मेष : आर्थिक स्थिती उत्तम
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी चंद्र आपल्या कुंडलीत धन स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. राशिस्वामी मंगळ आजच चतुर्थ स्थानी जाणार असल्याने ताे या राशीच्या व्यावसायिकांना काही आर्थिक लाभ, घर-वाहनादी स्थावराच्या खरेदीत यश देणारा ठरावा. निदान तशा याेजना आखल्या जाऊ शकतात. या सप्तमात काही युवकांच्या विवाहासंबंधीच्या घटनांना वेग देऊ शकताे. व्यवसाय-नाेकरीच्या दृष्टीने हा काळ उत्तम ठरू शकताे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. काहींना आराेग्याबाबत सतर्क राहावे लागेल. हवामान बदलामुळे संक्रमित हाेणाèया आजारांची लागण हाेऊ शकते. दरम्यान, नवीन ओळखी लाभप्रद ठरतील.
शुभ दिनांक - 20, 23, 25, 26.
 
 
वृषभ : सुखद व प्रगतीचे वातावरण
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्र आपल्या राशीतून भ्रमण सुरू करीत आहे. राशिस्वामी शुक्र सध्या सातव्या स्थानी असल्याने ताे जाेडीदाराला सुखद व प्रगतीचे वातावरण देणारा ठरावा. नाेकरदार वर्गाला हा आठवडा आर्थिक लाभ देणारा ठरावा. राशिस्वामी शुक्राची स्थिती युवकांना विवाह याेग, प्रेमसंबंधात पुढे जाण्याचे बळ देऊ शकेल. कुटुंबाला विश्वासात घेऊन प्रेमसंबंध विवाह बंधनात परिवर्तित करता येतील. सहल, भ्रमंतीच्या याेजनाही काहींना पूर्णत्वास नेता येतील. व्यावसायिकांना नवी गुंतवणूक, शेअर बाजारातील व्यवहार करता येतील. गाील राहून चालणार नाही.
शुभ दिनांक - 20, 21, 23, 25.
 
 
मिथुन : खर्चवाढ, आराेग्याची काळजी
Weekly Horoscope :  या आठवड्याच्या प्रारंभी चंद्र आपल्या कुंडलीत व्यय स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. राशिस्वामी बुध सध्या सहाव्या स्थानी शुक्रासाेबत असल्याने ताे युवकांना व सरकारी कर्मचाèयांसाठी उपयुक्त ठरावा. हा आठवडा काहीसा खर्चिक, अचानक आर्थिक संकट उभे करणारा, काहींना दगदग व आराेग्याची काळजी घ्यावयास लावणाराही ठरू शकताे. आठवड्याची सुरुवात उत्साहवर्धक ठरू शकते. नातेवाईक वा मित्रांचे एकत्रीकरण घडू शकेल. सप्ताहाच्या मध्यात धनेश चंद्र आपला आर्थिक डाेलारा शाबूत राखेल. काहींना प्रवासाचे याेग संभवतात. विद्यार्थ्यांना जराही गाील राहून चालणार नाही.
शुभ दिनांक - 21, 23, 24, 25.
 
 
कर्क : समाधानकारक आर्थिक लाभ
या आठवड्याच्या प्रारंभी आपला राशिस्वामी चंद्र आपल्या कुंडलीत लाभस्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. तेथे शुभंकर गुरू चंद्रासाेबत असून हा एक शुभ याेग बनला आहे. विशेष म्हणजे त्यांची पंचम या शुभ स्थानी दृष्टी असल्याने या सप्ताहात आपणास काहीही कमी पडणार नाही, याची खात्री बाळगता येईल. नाेकरी-व्यवसायातील आपली प्रतिष्ठा टिकून राहील. समाधानकारक आर्थिक लाभ हाेईल. विराेधकांची एकजूट मात्र दुर्लक्षित करू नका. काहींना आराेग्याच्या बाबतीत किरकाेळ त्रास अनुभवावा लागू शकताे. काैटुंबिक आघाडीवर समजूतदारपणा बाळगा. आकस्मिक खर्चांनी डगमगून जाऊ नका. विद्यार्थी व युवांना हा सप्ताह उत्तम जावा.
शुभ दिनांक - 22, 23, 24, 25.
 
 
सिंह : प्रगतीचे याेग लाभावेत
Weekly Horoscope :  या आठवड्याच्या प्रारंभी चंद्र आपल्या कुंडलीत दशम स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. राशिस्वामी रवी सध्या पराक्रम स्थानी असल्याने ताे भाग्य स्थानावर दृष्टी टाकून भाग्यवर्धक संधी देणारा ठरावा. हा याेग नाेकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी देऊ शकताे. कुणी आपल्या नाेकरीत बदलाचा विचार करीत असेल तर त्याला या ग्रहस्थितीचा लाभ घेता येऊ शकेल. मात्र व्यावहारिक विचारातून सारी खातरजमा करून घेणे जरूरी आहे. भागीदारीत व्यवसाय करणाèयांनाही बेसावध राहून चालणार नाही. आपल्या कार्यक्षेत्रात तणाव निर्माण हाेणार नाही, याची काळजी घ्या. कुटुंबातून उत्तम सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक - 20, 21, 25, 26.
 
 
कन्या : वाढीव खर्च सांभाळा
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्र आपल्या कुंडलीत नवव्या या भाग्य स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. राशिस्वामी बुध सप्ताहाच्या मध्यात पराक्रम स्थानी शुक्रासाेबत येणार असल्याने ताे युवावर्ग, व्यावसायिक व सरकारी कर्मचाèयांसाठी उपयुक्त ठरावा. ही ग्रहस्थिती आपला संपूर्ण आर्थिक डाेलारा सांभाळून घेण्यास सक्षम ठरेल. मात्र, वाढीव खर्च करण्यासही ही स्थिती उद्युक्त करणारी आहे. दरम्यान, या याेगामुळे कार्यक्षेत्रात काही उत्तम संधी या आठवड्यात लाभण्याची शक्यता आहे. विशेषतः इलेक्ट्राॅनिक्स-आयटी क्षेत्रात असणाèयांना नाेकरीच्या अतिशय चांगल्या संधी लाभू शकतात.
शुभ दिनांक - 21, 22, 23, 24.
 
 
तूळ : आर्थिक बाजूला मजबुती
Weekly Horoscope :  या आठवड्याच्या प्रारंभी चंद्र आपल्या कुंडलीत अष्टम या पीडादायक स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. राशिस्वामी शुक्र सध्या धनस्थानी असून आपल्या राशीत रवी विराजमान आहे. ताे आपल्याला व्यावसायिक, काैटुंबिक, आर्थिक समाधान देणारा ठरावा. आपल्या सबळ आर्थिक बाजूला आणखी मजबुती या सप्ताहात अवश्य मिळू शकेल. काही माेठी खरेदी, वाहन, घर, जमीन अशा स्वरूपाच्या खरेदीने कुटुंबात आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण हाेईल. काही दाम्पत्यांना संतती याेग यावेत तसेच मुलांकडून उत्तम, प्रगतिकारक वार्ता कळल्याने कुटुंबाच्या आनंदात भरच पडेल. नाेकरी बदलासाठीही उपयुक्त संधी लाभाव्या.
शुभ दिनांक - 22, 23, 24, 25.
 
 
वृश्चिक : आर्थिक व व्यावसायिक यश
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्र आपल्या कुंडलीत सप्तम स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे तर राशिस्वामी मंगळ सध्या भाग्य स्थानी येत असल्याने ताे या राशीच्या मंडळींना भाग्यवर्धक ठरावा. मंगळ नीच राशीत येणार असल्याने काहीशा प्रयत्नानंतर व प्रतीक्षा केल्यावर यश मिळू शकेल. या सप्ताहात आपणास आर्थिक व व्यावसायिक यश मिळावे. नवी नाेकरी लाभणे, पदाेन्नती, पगारवाढ, अधिकारवाढ आदी आपले महत्त्व वाढवणारे याेग यावेत. व्यवसाय विस्तार, नव्या क्षेत्रात पदार्पण करणे, नवा व्यवसाय सुरू करणे आदी स्वरूपातील गुंतवणुकीतून लाभ मिळेल. एखादी माेठी खरेदी, वाहनाची खरेदी केल्याने कुटुंबात आनंदाचे, वातावरण निर्माण हाेईल.
शुभ दिनांक - 20, 22, 23, 26.
 
 
धनू : कुटुंबात मंगल घटनाक्रम
Weekly Horoscope :  या आठवड्याच्या प्रारंभी चंद्र आपल्या कुंडलीत सहाव्या स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे तर राशिस्वामी गुरू सध्या सहाव्या स्थानात असल्याने ताे चंद्रासाेबत उत्तम राजयाेग निर्माण करीत आहे. त्यामुळे या राशीच्या मंडळींना हा सप्ताह आर्थिक आवक वाढविणारा ठरावा. या सप्ताहात आपली व्यावसायिक स्थिती उत्तम राहील. कुटुंबातही काही मंगल घटनाक्रम घडण्याची शक्यता आहे. स्थायी संपत्तीत वृद्धी हाेण्याचे याेग आहेत. एखाद्यावेळी माेठा खर्च उचलावा लागणर असला, तरी ताे सहज पेलता येऊ शकेल. घर, वाहन खरेदीसारख्या माेठ्या याेजनांना यामुळे मूर्त रूप लाभू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण हाेईल.
शुभ दिनांक - 21, 22, 23, 25.
 
 
मकर : उत्तम व शुभ\लदायी
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्र आपल्या कुंडलीत पंचम या शुभ स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे तर राशिस्वामी शनी सध्या धन स्थानी तर याेगकारक शुक्र दशम स्थानात विराजमान असल्याने सध्या तरी आपणास निघत्या साडेसातीचा काेणताही त्रास हाेण्याची शक्यता नाही. ही ग्रहस्थिती सर्वच क्षेत्रात उत्तम याेग देणारी ठरू शकते. त्यामुळे हा आठवडा अतिशय उत्तम व शुभ \लदायी ठरणार आहे. ज्यांचे अगाेदरपासून व्यवसाय सुरू आहेत त्यांना मरगळ झटकून, नव्या उमेदीने मुसंडी मारावयास काळ उत्तम ठरेल. नाेकरीत असणाèया मंडळींना नेहमीच्या चाकाेरीतून अधिकाèयांची मर्जी संपादन करता येईल.
शुभ दिनांक - 21, 22, 24, 26.
 
 
कुंभ : अधिकार लाभ संभवताे
Weekly Horoscope :  या आठवड्याच्या प्रारंभी चंद्र आपल्या कुंडलीतील चतुर्थ या सुख स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे तर राशिस्वामी शनी सध्या आपल्याच राशीत बलवान आहे. याेगकारक शुक्र दशम स्थानात विराजमान असल्याने व्यवसाय व नाेकरीतून आर्थिक व अधिकार लाभ संभवताे. धन स्थानातील नेपच्यून आपणास कसल्या तरी विचाराने झपाटू शकताे. एखादेवेळी माेठा खर्च करून आपण आपली कल्पना राबवायचा प्रयत्न कराल किंवा तशी याेजना आखणार असाल तर खिशावर जरा लक्ष ठेवा. काही जणांना विदेश वारीचे याेग निर्माण हाेतात. किमान त्यासाठीच्या हालचालींना वेग मिळू शकताे. आपल्या याेजनांमध्ये कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक - 21, 23, 24, 25.
 
 
मीन : उतावळेपणा करू नका
Weekly Horoscope :  या आठवड्याच्या प्रारंभी चंद्र आपल्या कुंडलीत पराक्रम स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे तर राशिस्वामी गुरू सध्या पराक्रम स्थानी असल्याने तेथे उत्तम स्वरूपाचा राजयाेग तयार झाला आहे. भाग्यावरील त्याच्या शुभ दृष्टीमुळे सध्या तरी आपल्याला कशाचीही कमी पडावयाची नाही. हा आठवडा आर्थिक लाभ देणारा राहीलच; मात्र काही आकस्मिक माेठे खर्च करावयास लावू शकताे. कुटुंबातील एखादी जबाबदारी उचलावयास लावणारे असू शकतात. आर्थिक आवक उत्तम असली, तरी एखाद्या व्यवहारात उतावळेपणा करावयास लावून धक्का बसू शकताे, तेव्हा काळजी घेतली पाहिजे. कुटुंबात काही मंगलकार्यांची मुहूर्तमेढ हाेईल.
शुभ दिनांक - 22, 23, 24, 25.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्याेतिष शास्त्री, 8600105746
Powered By Sangraha 9.0