दिवाळीसाठी घर स्वच्छ करताय ?

करा मिठाचा वापर

    दिनांक :20-Oct-2024
Total Views |
salt benefit for diwali तुम्ही पण दिवाळीसाठी घर साफ करण्यात व्यस्त आहात का? जर होय, तर तुम्ही साफसफाईसाठी हा घरगुती उपाय नक्की करून पहा. अन्नात मीठ न टाकल्यास, अन्नाला चव नाही येत. पण जर तुम्हालाही वाटत असेल की मीठाचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी होतो, तर हा गैरसमज दूर करायला हवा. मीठाचा वापर साफसफाईसाठी देखील केला जाऊ शकतो. एक चमचा मीठ तुमच्या घरातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींतील घाण काढून टाकण्यास उपयुक्त ठरू शकते.
 
 
  
salt
 
 
 स्वयंपाकघरातील टाईल्स
किचनच्या salt benefit for diwali टाईल्सवर तेल आणि मसाल्यांची डाग लागतात. त्याला आपण स्वच्छकरण्याचा प्रयत्न करतो. परंतु, तरीही काही डाग टाइल्सवर राहतात.याकरिता कोमट पाण्यात मीठ आणि बेकिंग सोडा मिसळा. आता या पाण्यात डस्टर भिजवा. या पाण्यात भिजवलेल्या डस्टरच्या मदतीने स्वयंपाकघरातील टाईल्स स्वच्छ करणे खूप सोपे जाते.
बाथरूम स्वच्छ करा
बाथरूममध्ये salt benefit for diwali डाग लागलेल्या बादल्या तुमच्या बाथरूमचा संपूर्ण लुक खराब करण्यासाठी पुरेशा आहेत. मिठात आढळणारे घटक बादल्या आणि मग पॉलिश करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. एक कप पाण्यात एक चमचा मीठ मिसळा. चांगले परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही पाण्यात बेकिंग सोडा देखील टाकू शकता. आता या मिश्रणात स्क्रब बुडवा आणि बादली आणि मग साफ करण्यास सुरुवात करा. काही मिनिटांतच तुम्हाला आपोआप सकारात्मक परिणाम दिसू लागतील.
तांब्याची भांडी
तांब्याची भांडी salt benefit for diwali स्वच्छ करण्यासाठी मीठ वापरता येते. मीठ काळी झालेली तांब्याची भांडी पूर्णपणे स्वच्छ करू शकते. तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी प्रथम लिंबू अर्धा कापून घ्या. आता या कापलेल्या लिंबावर एक चमचा मीठ लावा आणि नंतर या लिंबाने भांडी घासून स्वच्छ करा.