‘उडान'मुळे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली, 
केंद्र सरकारने 'Udan' scheme ‘उडान'सारखी योजना राबवल्यामुळे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केले. ‘उडे देश का आम नागरिक' (उडान) योजनेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ‘एक्स'वर नमूद केले की, लहान शहरांना विमान सेवेत जोडणे आणि अधिक परवडणारा विमान प्रवास करण्याच्या उद्देशाने उडान हा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे विमानतळ आणि हवाई मार्गांच्या संख्येत वाढ झाली आहे तसेच कोट्यवधी लोकांना हवाई उड्डाणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
 
 
UDAN
 
'Udan' scheme : उडान योजनेमुळे व्यापार व वाणिज्य वाढवण्यावर आणि प्रादेशिक विकासाला चालना देण्यावर चांगला परिणाम झाला आहे. आगामी काळात आम्ही विमान वाहतूक क्षेत्राला बळकट करत राहू आणि लोकांसाठी आणखी कनेक्टिव्हिटी आणि आरामावर लक्ष केंद्रित करू, असेही ते म्हणाले. उडान योजनेने २.८ लाख उड्डाणे सुलभ केली आहेत, त्यामुळे १.५ कोटी प्रवाशांना परवडणाऱ्या  हवाई प्रवासाचा अनुभव घेता आला आहे, असे सरकारी हॅण्डल एक्सवर म्हटले आहे. उडान उपक्रमामुळे ८६ विमानतळ कार्यान्वित केले आहेत आणि ६१७ मार्ग स्थापित झाली आहेत. त्यामुळे देशभरातील कनेक्टिव्हिटीमध्ये चांगली वाढ झाली आहे, असे त्यात म्हटले आहे.