अहेरी नपं प्रशासन पुन्हा संशयाच्या भोवर्‍यात!

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
आलापल्ली,
Aheri Nagar Panchayat नगर पंचायततर्फे अहेरी शहरात नव्याने होऊ घातलेल्या कामांची निविदा प्रक्रिया परत एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना कंत्राटदार संघटनेने निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नवीन कामांच्या निविदेबाबत सर्व कंत्राटदारांना माहिती असणे आवश्यक असते. त्यानुसार महत्त्वाचे वृत्तपत्र तथा नगरपंचायत फलकावर जाहिरात आणि संकेतस्थळावर ऑनलाइन करणे आवश्यक असते. मात्र तसे झाले नाही. निविदेबाबत कंत्राटदारांना काहीच माहिती देण्यात आली नाही. लिपिकाला वारंवार विचारणा करूनही संघटनेला निविदेची माहिती मिळाली नाही, असाही आरोप संघटनेने केला आहे.
 
sfrt7out
 
निविदा प्रक्रिया ही ऑफलाइन करून कार्यारंभ आदेश मर्जीतील कंत्राटदारांना देण्यात येणार आहे. त्यामुळे अहेरीतील शासकीय कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार संघटनाही आक्रमक झाली आहे. Aheri Nagar Panchayat विशेष म्हणजे याआधी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात नगर पंचायतीतर्फे कोट्यवधींची कामे ऑफलाइन निविदा न काढताच झाली आहेत, असा आरोप केला आहे. नगर पंचायत कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असून उघडपणे निविदा प्रक्रिया राबविते की नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. निविदा प्रक्रिया ही सार्वजनिक निविदा प्रक्रिया बांधकाम विभाग व नगर विकास विभाग यांच्या ठरवून दिलेल्या निर्देशानुसार झालेली आहे. ही एक हिंदी आणि मराठी वृत्तपत्रातदेखील टाकण्यात आलेली आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे.