यादीपूर्वीच १७ जणांना एबी फॉर्म

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
- अजित पवारांचा नवा फंडा
 
मुंबई, 
विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काही पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली, तर काही पक्ष त्याच्या तयारीत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Ajit Pawar अजित पवार यांनी पक्षाची अधिकृत यादी जाहीर करण्यापूर्वीच १७ जणांना एबी फॉर्म दिला.
 
 
Ajit Pawar
 
ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, त्यांना Ajit Pawar अजित पवार यांनी देवगिरी या शासकीय बंगल्यावर एबी फॉर्मचे वाटप केले. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून, २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. ज्यांना अजित पवार यांच्याकडून एबी फॉर्म मिळाले, त्यात प्रामुख्याने भरत गावित आणि हिरामण खोसकर यांचा समावेश आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर भरत गावित म्हणाले की, माझा मतदारसंघ राखीव आहे. नवापूर मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली. आधी परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. माझा विजय निश्चित आहे. मला उमेदवारी दिल्याबद्दल अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे आभार. तटकरे यांच्या उपस्थितीत मी २४ तारखेला अर्ज दाखल करणार आहे.
 
काँग्रेसमध्ये फसवणूक झाली : हिरामण खोसकर
हिरामण खोसकर म्हणाले की, काँग्रेसकडे आम्ही दोन महिने जात होतो. पण, त्यांनी ऐकले नाही. आमची फसवणूक होत असल्याचे वाटले आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. येथे एबी फॉर्म घ्यायला आमचे ५०० लोक आले आहेत. मग निवडणूक कशी होईल ते बघा. सकाळी ८ वाजता मला फोन आला आणि लगेच आम्ही या ठिकाणी आलो. दादांनी मतदारसंघात काम करायला सांगितले.
 
एबी फॉर्म मिळालेले नेते
राजेश विटेकर, संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील, दौलत दरोडा, राजेश पाटील, दत्तात्रय भरणे, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, ॠनरहरी झिरवळ, छगन भुजबळ, भरत गावित, बाबासाहेब पाटील, अतुल बेनके.