आले विधानसभा इलेक्शन!जपा गावकर्‍यांनो रिलेशन!!

Assembly Election-Villeges गावागावांत भांडणतंटे वाढले

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
वेध
 
- अनिल फेकरीकर
 
Assembly Election-Villeges लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. हीच स्वीकारून भारतात २६ जानेवारी १९५० पासून लोकशाही राज्य प्रणाली स्वीकारली आहे. या प्रक्रियेत लोकसभेसाठी खासदार निवडले जातात, तर विधानसभा निवडणुकीच्या माध्यमाने आमदारांची निवड सामान्य मतदार मतदान करून करीत असतात. मतदानाची प्रक्रिया पूर्णत: गोपनीय असते. मात्र, गेल्या काही वर्षांत इलेक्शन येताच शहरासह गावखेड्यातील माहोल खराब होत जातो. गावगाड्यातील जी काही वर्षांनुवर्षे जपलेली असतात, त्यांनाही निवडणुकांमुळे तडा जातो. Assembly Election-Villeges कालपर्यंत एखादा मुलगा शेजार्‍याला मोठ्या आदराने काका/मामा म्हणून आवाज देतो; तो अचानक राजकारणाचा संचार होताच त्यांच्याशी बोलणेही सोडून देतो. त्याला वाटते की, काका/मामा तर विरोधी पक्षातील आहेत. म्हणजे काका आपले शत्रूच असल्याचे तो मानतो. कारण त्याला राजकारणात येण्यापूर्वी योग्य प्रशिक्षणच मिळालेले नाही. वाटते की, विरोध करणे म्हणजेच राजकारण असते. पण विरोधाला विरोध करणे म्हणजे राजकारण नसते तर विरोधाला प्रेमाने जिंकणे, एखादा मुद्दा विविध उदाहरणे देत पटवून देणे आणि आपले म्हणणे कसे देशहिताचे आहे हे संसदीय भाषेत सांगणे म्हणजे राजकारण होय.
 
 
 

Assembly Election-Villeges 
 
 
 
Assembly Election-Villeges याची परिभाषा बहुतांश नेत्यांनाच ठाऊक नसल्याने ती मंडळी कार्यकर्त्यांना काय सांगणार असाच प्रकार वाढला आणि गावागावांत भांडणतंटे वाढले. अशाच स्वरूपाचे वाद आता २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात वाढतील. पण यात सहभागी होण्यापूर्वी प्रत्येकाने एकदा तरी सुज्ञपणे विचार करायला हवा. त्यांनी झाले गेले विसरून विधानसभा इलेक्शन असले तरी रिलेशन जपायला हवे. आजपर्यंत जे वाद झाले, त्यातून कुणाला काहीही नाही. पक्षकारांच्या वादविवादाला कोर्टही कंटाळले होते म्हणूनच त्यांनी लोकअदालत हा स्तुत्य उपक्रम अंमलात आणला आहे ना? Assembly Election-Villeges मग आपण लोकशाहीच्या मंदिरात जाण्यापूर्वी भांडण करून आयुष्य खराब का करीत आहोत, तोच प्रकार वारंवार झाल्याने गावाच्या सर्वांगीण विकासावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. असा परिणाम झाला नसता तर आज भारतातील ७६६ जिल्ह्यांच्या येणार्‍या ६ लाख ६४ हजार ३६९ गावांमध्ये सर्व काही सुजलाम् सुफलाम् राहिले असते. महाराष्ट्राचा विचार करता ३६ जिल्ह्यांतील ४४ हजार ७२७ गावे स्वयंपूर्ण राहिली असती. पण वस्तुस्थिती मोठी विचित्र आहे. स्वार्थाने प्रेरित असलेल्या राजकारणाने गावातील चांगल्या वातावरणाचा सत्यानाश केला आहे.
 
 
 
 
Assembly Election-Villeges आपल्या देशातील लोकशाहीचा पाया मजबूत असल्याचे म्हटले जाते. मग देशातील सुज्ञ मतदार गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या किंवा तिथेच मुक्कामी नेत्याला निवडूनच कसे देतात, हाही प्रश्न मन सुन्न करणाराच आहे. अहो, कारागृहात गेलेल्या व्यक्तीचे रक्त वैद्यकीय क्षेत्र स्वीकारत नाही. मग त्या व्यक्तीला लोकशाहीच्या मंदिरासाठी आमदार, खासदार म्हणून आपणही का स्वीकारावे, असाही प्रश्न सुज्ञ म्हणवून घेणार्‍या मतदारांनी स्वत:ला विचारायला हवा. स्वार्थी लोकांच्या नादी लागतो आणि वर्षांनुवर्षे जपलेल्या नात्यांना मूठमाती देतो. परिणामी इलेक्शन येताच रिलेशन खराब होतात. Assembly Election-Villeges हा प्रकार आपल्या लोकशाही व्यवस्थेला अभिप्रेत नाही. अनेक गावखेड्यात निवडणुकीच्या रंगात एकमेकांवर गलिच्छ आरोप करीत जीवघेणे हल्ले केले जातात. कार्यकर्त्यांना चिवडा आणि दारू यात बुडवले जाते. यातून रिलेशन कसे जपले जाणार? यामुळे तर वाद वाढतील.
 
 
 
ज्यांना आपला स्वत:चा फायदा करून घ्यायचा ते कार्यकर्त्यांमध्ये भांडण लावून देतात आणि ते विधानसभेत जाऊन आमदारकीचा लाभ घेतात. इकडे कार्यकर्ते इलेक्शनच्या नावाखाली रिलेशन खराब करून घेतात. पण आतापर्यंत जे झाले ते विसरून प्रत्येकाने निवडणूक असो किंवा नसो सर्वांशी प्रेमाने, आदराने राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा. वैद्यकीय जगताचा अभ्यास करता ताणतणावामुळे अनेकांचे आरोग्य खराब झाले आहे. Assembly Election-Villeges त्यात हा राजकारणाचा ताण सहन होण्यासारखा मुळीच नाही. तेव्हा आपल्या आरोग्याचे पानिपत करून घेण्यापेक्षा शांतपणे सर्व मतदारांनी वादाला वेशीवरच ठेवले तर नक्कीच गावागावांत शांतता नांदेल. एक सांगतो, जेव्हा गावात किंवा घरात शांतता नांदते तेव्हाच तेथील प्रगती सुरू होत असते. तेव्हा प्रगती करायची असेल गावकर्‍यांनो निवडणुकीच्या रंगातही रिलेशन जपण्यासाठी पुढाकार घ्या.
९८८१७१७८५९