आम्ही जेवत होतो, अचानक लाईट गेली अन् अंधाधुंद गोळीबार!

21 Oct 2024 11:33:37
जम्मू,  
Ganderbal terrorist attack जम्मू आणि काश्मीरच्या गांदरबलमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला. २ जणांचा जागीच मृत्यू झाला. ५ जखमींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गांदरबल जिल्ह्यातील श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर बोगदा बांधण्याच्या कामात गुंतलेल्या कामगारांवर हा हल्ला करण्यात आला. गंदरबल हा राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा वडिलोपार्जित विधानसभा मतदारसंघ आहे. उमर अब्द्दुला यांचे वडील आणि आजोबा या जागेवरून आमदार होते. जम्मू पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंदरबलमधील गगनगीर शहरातील गुंड भागात महामार्गावर बोगद्याचे काम सुरू आहे. बांधकामाचे कंत्राट असलेल्या कंपनीच्या कंत्राटी कामगारांवर गोळीबार झाला. ते दुपारी जेवायला बसले होते, अचानक दिवे गेले आणि वेगाने गोळीबार सुरू झाला. समोर दोन जण शस्त्रे घेऊन उभे असलेले दिसले. यानंतर हॉस्पिटलमध्ये माझे डोळे उघडले आणि कळले की ५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. कंपनीचा एक कर्मचारी आणि एका डॉक्टरचाही मृत्यू झाला आहे.
 
dnhdyd
 
गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) व्ही के बिर्डी यांनी माध्यमांना सांगितले की, गगनगीर दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या 7 कर्मचाऱ्यांमध्ये एक डॉक्टर, मेकॅनिकल प्रभारी, सुरक्षा प्रभारी, नियोजन विभागाचे कर्मचारी यांचा समावेश आहे. कर्मचारी जेवत असताना दोन दहशतवादी घुसले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. Ganderbal terrorist attack गोळीबारात डॉ. शाहनवाज (आरोग्य प्रभारी), फहीम नसीर (सुरक्षा व्यवस्थापक), अनिल शुक्ला (मेकॅनिकल मॅनेजर), शशी अब्रोल (डिझायनर), गुरमीत सिंग (रिगर), हनीफ (कामगार), कलीम (आरोग्य व्यवस्थापक) यांच्यासह ७ जणांचा मृत्यू झाला. कर्मचारी) यांचा सहभाग होता. 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्यांना मोठा धडा शिकवण्याचे आदेशही गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0