परतीच्या पावसाने शेतपिकाचे प्रचंड नुकसान

21 Oct 2024 18:58:47
देसाईगंज,
Heavy loss of crops आरमोरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चारही तालुक्यात परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता नुकसानग्रस्त शेतपिकाचे तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी चारही तालुक्यातील तहसीलदारांना दिले आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या धानोरा, आरमोरी, कुरखेडा तसेच कोरची तालुक्यात १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या परतीच्या पावसाने उभ्या धान पिकाचे तसेच कापलेल्या धान पिकावर पाणी जाऊन पिक पाण्याखाली आल्याने सडून प्रचंड नुकसान झाले आहे.
 
ghuyuytrt
 
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील सदर चारही तालुक्यातील शेतकर्‍यांची उपजिवीका धान पिकावर अवलंबून आहे. शेतकर्‍यांची एकुणच आर्थिक स्थिती बेताचीच असुन अनेकांनी कर्ज घेऊन, हात उसणवार करून शेती केली आहे. धान पिक ऐन भरात असतांना व मळणीसाठी धान पिकाची कापणी करण्यात आली असतांना कडपा पाण्याखाली येऊन धान सडल्याने प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. Heavy loss of crops शासकीय स्तरावरुन शेत पिकाचे एक रुपयात पीकविमा काढण्यात आल्याने प्रमाणापेक्षा अधिक नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देय आहे. ही नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळणे अपेक्षित असल्याने नुकसानग्रस्त शेत पिकाचे तत्काळ मोका चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदार गजबे यांनी संबंधित चारही तहसीलदारांना दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0