गुजरातमध्ये मेफेड्रोनसह ४२७ किलो मादकपदार्थ जप्त

21 Oct 2024 19:29:25
- चार आरोपींना अटक
 
भडुच/सुरत, 
Mephedrone seized in Gujarat : एका कारखान्यातून २.१४ कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे मेफेड्रोन आणि ४२७ किलो संशयित मादकपदार्थ जप्त केले. दुसèया एका समांतर कारवाईत गुजरातच्या भडुच आणि सुरत येथून चार आरोपींना अटक करण्यात आली, अशी माहिती अधिकाèयाने सोमवारी दिली.
 
 
Mephedrone seized
 
Mephedrone seized in Gujarat : सुरतमधील वेलांजा गावात चार चाकी वाहनातून रविवारी सायंकाळी दोन किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त करीत तीन जणांना अटक केली, अशी माहिती सुरतचे पोलिस आयुक्त अनुपम qसह गहलोत यांनी दिली. दुसèया पथकाने अंकलेश्वर जीआयडीसीतील अवसर एंटरप्रायजेसवर रविवारी रात्री छापेमारी करीत संशयित मादकपदार्थाची ४२७ किलोची खेप जप्त केली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली. ही खेप न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0