गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ला...डॉक्टरांसह ६ ठार

21 Oct 2024 10:21:41
जम्मू,  
Terrorist attack in Ganderbal जम्मू-काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात एका बांधकामाच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार केला असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक डॉक्टर आणि ५ मजुरांचा समावेश आहे. यासोबतच ५ जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. संपूर्ण परिसराचे छावणीत रुपांतर झाले आहे. संध्याकाळी दहशतवाद्यांनी कामगारांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कामगार बोगद्याच्या प्रकल्पात काम करत होते. गोळीबारानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. गुरमीत सिंग (गुरदासपूर पंजाब), डॉ. शाहनवाज, अनिल कुमार शुक्ला, मोहम्मद फहीम यांचा जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्याच वेळी, दोन मृत मजुरांची अद्याप ओळख पटलेली नाही.
 हेही वाचा : शंका नाही...बारामती दादांचीच!

gadawal 
 
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गंदरबल जिल्ह्यातील बिगर स्थानिक मजुरांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिले की, 'सोनमर्ग भागातील गगनगीरमध्ये गैर-स्थानिक मजुरांवर भ्याड हल्ल्याची दुःखद बातमी. JK Terror Attack मी नि:शस्त्र निष्पाप लोकांवर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्या प्रियजनांप्रती शोक व्यक्त करतो. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. याच्या दोन दिवसांपूर्वी शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी बिहारमधील एका मजुराची गोळ्या झाडून हत्या केली होती. हेही वाचा : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून 4 संघ जवळपास बाहेर!
गेल्या शुक्रवारी, जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बिहारमधील एका व्यक्तीचा गोळ्यांनी छळलेला मृतदेह पोलिसांनी जप्त केला होता. पोलिसांनी सांगितले की, बिहारचे रहिवासी अशोक चौहान यांचा गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न मृतदेह शोपियान जिल्ह्यातील जैनपोरा भागातील वंदुना गावातून सापडला आहे. JK Terror Attack याआधीही दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये मजुरांना लक्ष्य केले होते. १७ एप्रिल रोजी अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात बिहारमधील एका मजुराचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी ९ जून रोजी रियासीच्या शिव-खोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी आधी बस चालकाची हत्या केली होती. यानंतर बस खड्ड्यात पडली. दहशतवाद्यांनी यात्रेकरूंवर सुमारे 20 मिनिटे गोळीबार केला, ज्यामध्ये ९ लोक ठार झाले तर ४४ यात्रेकरू जखमी झाले.
Powered By Sangraha 9.0