2019 नंतर जम्मूमध्ये सर्वात मोठे टार्गेट किलिंग!

21 Oct 2024 12:41:30
नवी दिल्ली,
attack in Jammu after 2019 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीनंतर दहशतवादी संघटना सर्वांचे लक्ष वेधून घेऊ इच्छितात, त्यामुळे ते टार्गेट किलिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2019 नंतरची ही सर्वात मोठी टार्गेट किलिंग आहे. शेख सज्जादचे साथीदार पाकिस्तानी दहशतवादी आणि स्थानिक मुलांच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचाही पाठिंबा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवणे हा त्यांचा उद्देश आहे. हेही वाचा : कोणाचा खेळ करणार मनोज जरांगे!
 

jammy
 
हेही वाचा :  VIDEO : काश्मीरला पाकिस्तान बनू देणार नाही
2019 नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये झाला आहे. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली आहे. TF हा लष्कर-ए-तैयबाचा मुखवटा आहे. त्याचे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी पळून गेले आहेत. या हल्ल्याचा मास्टरमाईंड शेख सज्जाद गुल हा पाकिस्तानात लपून बसल्याचे बोलले जात आहे. एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) ने 2019 मध्येच यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यासोबतच आणखी तीन दहशतवादी आहेत, ज्यांच्या मदतीने शेख सज्जाद संपूर्ण नेटवर्क चालवत आहे.
Powered By Sangraha 9.0