सोयाबीनच्या भावासाठी कारंजात रास्ता रोको

21 Oct 2024 17:58:15
कारंजा लाड, 
कारंजा बाजार soyabean production समितीत सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी एका व्यापार्‍याच्या सोयाबीनच्या ढेरावर व्यापार्‍यांनी चक्क २६०० रुपये प्रती क्विंटल दाराची बोली लावल्याने शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी बाजार समिती बाहेर येऊन कारंजा मंगरूळनाथ मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी जय जवान जय किसान आणि सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा शेतकर्‍यांनी दिल्याने आसमंत दुमदुमून गेला होता.
 

soyabean  
 
soyabean production शेतकरी आक्रमक झाल्याची वार्ता वार्‍यासारखी शहरात पसरली त्यामुळे प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि शेतकर्‍यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु शेतकरी मात्र समजण्याच्या मनस्थितीत नसल्याने काही काळ आंदोलन तसेच सुरू होते. यावेळी शेतकर्‍यांनी मध्यप्रदेशच्या धर्तीवर सोयाबीन साठी भावांतर योजना लागू करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर कारंजाचे पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुला, ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे, धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तहसीलदारांनी थेट जिल्हाधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीद्वारे घटने संदर्भात चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी वरिष्ठ स्तरावर सोयाबीनच्या दरासंदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले. तरीही शेतकरी आंदोलनावर ठाम होते, अखेर पोलिसांनी निर्माण झालेले तणावाचे वातावरण निवळण्यासाठी काही शेतकर्‍यांसह दोन राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
soyabean production रब्बी हंगामासाठी रासायनिक खते व बी बियाण्याची खरेदी आणि दिवाळी तोंडावर असल्याने शेतकर्‍यांना सोयाबीन विकण्याची गरज आहे. नेमक्या याच बाबीचा फायदा व्यापार्‍यांकडून घेतल्या जात असून सोयाबीनला ३ हजार रुपये पासून बोली लावल्या जात आहे. अशातच सोमवारी मात्र एका शेतकर्‍याच्या ढेरावर केवळ २६०० रुपयांची बोली लावल्याने शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. कारंजा बाजार समितीत शनिवारी जवळपास ९ हजार क्विंटल ची आवक होती त्यानंतर रविवारी बाजार समिती बंद असल्याने आज पुन्हा आवक वाढली. त्यामुळे व्यापार्‍यांनी सोयाबीनची हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या रस्ता रोको आंदोलनादरम्यान एका शेतकर्‍याची प्रकृती देखील बिघडली होती. मात्र शेतकर्‍यांनी या रास्ता रोको आंदोलनात उस्फुर्त सहभाग दर्शविल्याने शेकडो शेतकरी सोयाबीनच्या भावासाठी रस्त्यावर उतरल्याचे प्रकर्षाने जाणवले.
Powered By Sangraha 9.0