'सर, आम्ही तुमची शिकवण लक्षात ठेऊ'

21 Oct 2024 18:40:34
मानोरा, 
विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून favorite principal कारखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत नेमणुकीला असलेले मुख्याध्यापक यांची पदोन्नतीने भुली येथे बदली झाल्यानिमित्य शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या निरोप समारंभात वातावरण भावना विवष झाल्याने आपल्याला आई-वडिलांनंतर प्रिय असलेले शिक्षक यापुढे ज्ञानदान करायला असणार नाहीत याची जाणीव झाल्याने विद्यार्थ्यांचा अश्रुचा बांध फुटला.
 

students say good bye 
 
सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषद favorite principal  शाळा कारखेडा येथे रणजीत राजुसिंग जाधव हे जिल्हा परिषदे कडून नियुक्त करण्यात आले होते.शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उपजत गुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षक जाधव यांनी आपल्या कार्यकाळात मोठे प्रोत्साहन दिले. कारखेडा येथील अधिकाधिक विद्यार्थी काळाच्या कसोटीवर टिकण्यासाठी तयार व्हावेत हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यावर मुख्याध्यापक जाधव यांनी सहकारी शिक्षकांसमवेत विशेष भर दिला. कोरोना या महामारीच्या काळात गावामधील एकही नागरिक लसीकरणा वाचून राहू नये यासाठी मुख्याध्यापक जाधव यांनी सेवांतर्गत केलेले प्रयत्न संपूर्ण राज्यभर गाजले होते.
 
राज्य शासनाच्या विविध favorite principal  शिष्यवृत्ती परीक्षा व केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यावर मुख्याध्यापक जाधव यांनी भर दिला होता. तालुयातील भुली येथे पदोन्नतीने जाणारे मुख्याध्यापक रणजीत जाधव यांचा शाळा व्यवस्थापन समिती, ग्रापं पदाधिकारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सपत्नीक नुकताच निरोप समारंभ देण्यात आला असता दुःखी झालेले अनेक विद्यार्थी यावेळी आपल्या प्रिय शिक्षकांना बिलगून रडत होते ज्यांना शिक्षक जाधव व त्यांच्या सौभाग्यवती व सहकारी शिक्षकांनी धीर दिला.
Powered By Sangraha 9.0