यादवांच्या कार्यक्रमात घुसले वंचितचे कार्यकर्ते !

-माईक हिसकावला, खुर्च्या तोडल्या

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
अकोला,
अकोल्यातील महाराष्ट्र डेमोक्रेटिक vidhansabha elections  फ्रंट यांनी आयोजित केलेल्या vidhansabha elections कार्यक्रमात भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर, योगेंद्र यादव यांचे भाषण बंद पाडण्यात आले. योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत’ या चर्चेवर सभा सुरू होती. या सभेत योगेंद्र यादव भाषण करत असताना वंचितच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यापूर्वीच माईक हिसकावून घेत गोंधळ घातला. योगेंद्र यादव यांचे भाषण सुरू असताना त्यांचे भाषण बंद पाडण्यात आल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. जिल्हा परिषदच्या कर्मचारी भवन येथील हा संपूर्ण प्रकार असून या घटनेच्या चित्रफित समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्या आहेत. गोंधळानंतर संयोजकांनी योगेंद्र यादव यांच्याभोवती सुरक्षा वर्तुळ निर्माण करून त्यांना हलविले.
 

akola  
 
 जवाब दो.. जवाब दो...चे नारे दिले 
योगेंद्र यादव यांच्या कार्यक्रमात  vidhansabha elections  संविधानाच्या दृष्टिकोनातून काय चर्चा झाल्या, जवाब दो.. जवाब दो... असे नारे देत वंचितच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी, काही कार्यकर्त्यांनी स्टेजवर जातं माईक हाती घेऊन सामानाची फेकाफेकही केल्याचं दिसून आले. त्यामुळे, नियोजितपणे सुरू असलेला योगेंद्र यादव यांचा येथील कार्यक्रम बंद पाडण्यात आला आहे. मात्र, वंचितच्या पदाधिकार्‍यांकडून कशामुळे हा गोंधळ घालण्यात आला, यावर अद्याप स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. पण, संविधानाच्या अनुषंगाने काय चर्चा केल्या, काय विचारमंथन केले, असा जाब वंचितकडून विचारला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र डेमोक्रेटिक फ्रंट आणि भारत जोडो अभियानाच्या वतीने या सभेचे आयोजन केले गेले होते. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगेंद्र यादव, उल्का महाजन, संजय मंगला गोपाळ उपस्थित होते.