क्रीडा स्पर्धेत दोघींना सुवर्णपदक

21 Oct 2024 18:57:39
मानोरा, 
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य washim girls get gold तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशीम यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रिडा स्पर्धेत मानोरा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय म्हसणीच्या विद्यार्थीनींनी लांब उडी व गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवीला आहे.
 
 
गर्ल्स षीने विथ gold
 
 
१७ वयोगटात प्रथम व १४ वर्षे वयोगटात washim girls get gold प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करून विभागस्तरावर झेप घेतली आहे.जिल्हा क्रीडा संकुल, वाशीम येथे जिल्हास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेचे १४ वर्षे वयोगटातील स्पर्धा १८ ऑक्टोबर  व १७ वर्षे वयोगटातील स्पर्धेचे १९ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १४ वर्ष वयोगटाच्या गोळाफेक स्पर्धेत रिया शिशुपाल कानडे हिने प्रथम क्रमांक मिळविला व लांबउडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवित विभागीय स्पर्धेकरिता पात्र ठरली आहे. तसेच १७ वर्षे वयोगटाच्या लांब उडी स्पर्धेत प्राची विठ्ठल पाचडे हिने प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र ठरली आहे. रिया कानडे व प्राची पाचडे या दोनही विद्यार्थींनी जिल्हास्तरावर विजयी झाल्याबद्दल सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे जिल्हा क्रीडा विभाग, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील पालकांनी कौतुक केले आहे.
Powered By Sangraha 9.0