आजपासून विधानसभा निवडणूक नामनिर्देशनपत्राची विक्री

    दिनांक :22-Oct-2024
Total Views |
 
wardha
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Assembly Election Nomination Paper विधानसभा निवडणुकीकरिता उद्या मंगळवार 22 रोजी पासुन सकाळी 11 ते 3 या वेळेत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभेसाठी नाम निर्देशन पत्रांची विक्री व स्वीकारनी सुरू होणार आहे. मंगळवार 29 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आर्वी विधानसभा मतदार संघासाठी उपविभागीय कार्यालय आर्वी येथे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास शिरसाट यांच्या कार्यालयात, देवळी विधानसभा मतदार संघासाठी तहसिल कार्यालय देवळी येथे निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका पवार कार्यालयात, हिंगणघाट विधानसभा मतदार संघासाठी उपविभागीय कार्यालय हिंगणघाट येथे निवडणूक निर्णय अधिकारी वंदना संवरगपते कार्यालयात तर वर्धा विधानसभा मतदार संघासाठी उपविभागीय कार्यालय वर्धा येथे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक कारंडे यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्राची उचल व दाखल करता येणार आहे. आर्वी, हिंगणघाट व वर्धा विधानसभा मतदार संघातील नामनिर्देशनपत्राची छाननी उपविभागीय कार्यालय येथे व देवळी विधानसभा मतदार संघातील तहसील कार्यालय येथे 30 रोजी सकाळी 11 वाजता पासुन करण्यात येणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.