भाजपाच्या अचलपूर उमेदवारीवरून वादळ

अनेकांनी फडकविले बंडाचे निशाण

    दिनांक :22-Oct-2024
Total Views |
तायडेंची उमेदवारी रद्द करण्याची मागणी
अमरावती,
BJP's Achalpur candidature भाजपाने रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातल्या अचलपुर विधानसभा मतदारसंघासाठी प्रवीण तायडे यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीवरून अचलपुर भाजपात वादळ उठले असून अनेकांनी बंडाचे निशाण फडकवित तायडेंची उमेदवारी रद्द करण्याची मागणी सोमवारी सांयकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली. आता भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारी प्रवीण तायडे यांचे नाव जाहीर झाल्याबरोबरच अचलपुर भाजपात असंतोष उफाळून आला. समाजमाध्यमांवर नाराजीचे सुरू उमटालया लागले. धुसफुस ठिकठिकाणावरून चव्हाट्यावर यायला लागली. याच असंतोषाला सोमवारी सांयकाळी भाजपाच्या अनेक पदाधिकार्‍यांनी वाट मोकळी करून दिली. बंडाचे निशाण फडकवत हे पदाधिकारी म्हणाले, जो व्यक्ती जिंकूच शकत नाही, त्याला उमेदवारी देण्यात आली आहे. प्रवीण तायडे यांना कोणत्या आधारावर उमेदवारी देण्यात आली, हे समजायला मार्ग नाही. आमच्या भावनांचा विचार झालेला नाही. वरिष्ठांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. जिल्हाध्यक्ष खा. अनिल बोंडे यांच्याकडे आम्ही आमचे म्हणने मांडले आहे.
 
 
 
bjpm
 
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आम्ही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना आम्ही पर्याय दिला आहे. प्रवीण तायडे यांची उमेदवारी रद्द झाली नाही तर सामुहीक राजीनामे देऊ. तायडे यांची शिफारस कोणी केली, हे आमच्या लक्षात आले आहे. उमेदवारी देण्यासाठी जे मतदान घेण्यात आले होते, BJP's Achalpur candidature ते सुद्धा तायडे यांनी विधानसभा प्रमुखाचे अधिकारी वापरून मॅनेज केले होते, असा आरोप त्यांनी केला. २० वर्षानंतर अचलपुर मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला आहे. असे असताना अनेक वर्षापासून काम करणार्‍यांना डावलून काही वर्षापूर्वी आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती मतदारसंघाच्या बाहेरचा आहे. आम्ही सगळी मंडळी पक्षाच्या कार्यासाठी काही दिवसांपासून मतदारसंघातल्या विविध भागात फिरतो आहे.
 
तायडे यांच्या बद्दल कुठूनच सकारात्मक प्रतिसाद आम्हाल मिळाला नाही. ते विजयी होऊ शकत नाही, याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. पक्षाचे नुकसान आम्ही पाहू शकत नाही. पक्षाने निर्णय बदलला नाही तर अ‍ॅड. प्रमोदसिंह गड्रेल, सुधरी रसे, मनोहर सुने, गोपाल तिरमारे, अक्षरा लहाने, डॉ. राजेश उभाड, नंदू वासनकर, BJP's Achalpur candidature अभय माथने यापैकी तीन उमेदवारी दाखल करतील अंतिम क्षणी आम्ही एकाची उमेदवारी कायम ठेऊ आणि त्याला विजयी करण्यासाठी एकदिलाने काम करणार असल्याचे सर्वांनी एकमुखाने सांगितले. पत्रकार परिषदेला उपरोक्त मंडळींसह प्रसन्ना काठोळे, विनोद खलोकार, मयुर खापरे, सुमीत निंभोरकर, विलास दामेधर, जयसिंग ठाकूर, माधव अवघड, अतुल दारोकार यांच्यासह अन्य हजर होते.