पत्नीने शारिरीक संबंधासाठी दबाव टाकते...

    दिनांक :22-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Decision on Divorce Case पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका खटल्यात निकाल देताना म्हटले आहे की, जर एखादी पत्नी आपल्या पतीला हिजडा म्हणते तर ते मानसिक क्रूरता आहे. न्यायमूर्ती सुधीर सिंह आणि न्यायमूर्ती जसजित सिंग यांच्या खंडपीठाने घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी करताना हा निर्णय दिला. महिलेच्या सासूने सांगितले की, ती तिच्या पतीला षंढ म्हणायची. 2017 मध्ये दोघांचे लग्न झाले होते. या प्रकरणाची सुनावणी करताना खंडपीठाने म्हटले की, कौटुंबिक न्यायालयाचे रेकॉर्ड आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेऊन महिलेने जे काही सांगितले ते क्रूरपणाचे आहे. पतीला षंढ म्हणणे किंवा तिने षंढला जन्म दिल्याचे आईला सांगणे हे मानसिक क्रूरतेच्या श्रेणीत येते, असे न्यायालयाने म्हटले आहे. 
 
evrsd
पतीने कौटुंबिक न्यायालयात आपल्या याचिकेत म्हटले आहे की, त्याची पत्नी रात्री उशिरापर्यंत जागी राहते आणि नंतर त्यांच्या आजारी आईला खालून बेडरूममध्ये जेवण पाठवण्यास सांगते. पत्नीला पॉर्न पाहण्याचे व्यसन असून मोबाईल गेमही खेळत असल्याचे त्याने सांगितले. पतीने सांगितले की, पत्नी दीर्घ संभोग करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणते, एवढेच नाही तर ती म्हणते की संभोगाची वेळ देखील 10 ते 15 मिनिटे असावी. Decision on Divorce Case पतीने आपल्या याचिकेत पुढे म्हटले आहे की, त्याची पत्नी त्याला सांगते की ती शारीरिकदृष्ट्या आजारी आहे आणि तिला दुसऱ्याशी लग्न करायचे आहे. पतीनेच घरातून हाकलून दिल्याचे पत्नीने सांगितले. महिलेचा आरोप आहे की, तिचे सासरचे लोक तिला झोपेच्या गोळ्या देत असत आणि जेव्हा ती गाढ झोपेत असते तेव्हा ते तांत्रिकाकडून ताबीज आणून तिला घालायला लावायचे. याशिवाय ते असे पाणी पिण्यासाठी द्यायचे जेणे करून त्यावर नियंत्रण ठेवता येईल. या प्रकरणी उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पती-पत्नी गेल्या 6 वर्षांपासून वेगळे राहत आहेत. दोघांना एकत्र आणणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाने पत्नीचे अपील फेटाळून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.