मसाले पिकांची लागवड आणि गुणवत्ता कार्यशाळा

    दिनांक :22-Oct-2024
Total Views |
नागपूर,
G H Raisoni University स्पाइस पार्क, छिंदवाडा आणि कृषी विज्ञान महाविद्यालय, जी एच रायसोनी विद्यापीठ, साईखेडा यांच्यातर्फे शेतकऱ्यांना मसाले पिक लागवडीच्या आधुनिक तंत्रांची माहिती, तसेच मालाची गुणवत्ता सुधारावी या उद्देशाने मसाले पिक लागवडीवरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्पाइसेस पार्कचे उप-संचालक व शास्त्रज्ञ डॉ. भरत गुडधे, वैज्ञानिक आशिष जैस्वाल, आणि आरओ, स्पाइसेस बोर्ड, गुना (एमपी) हे प्रमुख पाहुणे आणि डॉ. केविन गवळी, डीन SOAS कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना व प्रमुख पाहुणे व निमंत्रित शेतकऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.जयस्वाल यांनी उपस्थितांना संबोधित केले आपल्या उद्घाटनपर संबोधनात मसाल्यांची लागवड, मालाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मौल्यवान अनुभव, सूचना शेअर केल्या. डॉ.गुडधे यांनी पारंपारिक शेतीकडून मसाल्याच्या शेती कडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले. डीन डॉ. केविन यांनी कृषी समुदायाकरिता संस्थेने उत्कृष्टतेच्या दिशेने उचललेली पावले आणि कृषी संसाधनांसाठी SOAS ची महत्त्वाची भूमिका यांची भूमिका स्पष्ट केली.
 
chafekar
 
  
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी SOAS चे डॉ.आशिष सारडा, डॉ.चेतन बोंद्रे, डॉ. आशुतोष राजोरिया, प्रा. राकेश तुरकर, प्रा. शुभाशिष रक्षित, डॉ. दीपक सपकाळ,G H Raisoni University डॉ. परेश बाविस्कर, डॉ. आशिष लाडे, डॉ. अजय हलधर, डॉ. देवश्री पंचभाई, गिरीश गोर्ले, पवन, संजय दास, प्रवीण पोहनकर आणि अनिल यांनी कार्यशाळेतील सर्व कार्यक्रमांचे व्यवस्थापन व कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या कार्यशाळेमुळे छिंदवाडा भागातील शेती मध्ये बदल घडून येतील, हे निश्चित.मसाले हे दैनंदिन आहाराचा मुख्य भाग आहेत आणि संतुलित आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक. छिंदवाडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची मोठी क्षमता मसाले पिकांमध्ये आहे.
सौजन्य: डॉ. नरेश चाफेकर,संपर्क मित्र