तिसर्‍या आघाडीसाठी मधुसुदन हरणे यांच्या नावाची चर्चा

22 Oct 2024 10:19:02

harne
 
 
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट, 
Madhusudan Harne in hinganghat परिवर्तन महाविकास आघाडीच्या वतीने हिंगणघाट मतदार संघासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष मधुसूदन हरणे यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असून येत्या एक - दोन दिवसात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मधुसूदन हरणे महाविद्यालयीन जीवनापासून शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरित होऊन शेतकरी संघटनेच्या कार्यात त्यांनी झोकून दिले. 1995 साली शेतकरी नेते शरद जोशी यांचा हिंगणघाट मतदार संघातून पराभव झाल्यानंतर अनेक बिनीचे शिलेदार त्यांना सोडून गेले. परंतु, मधूसुदन हरणे यांनी शेतकरी विचाराची ज्योत कायम ठेवलेली आहे. सरपंच ते जिप सदस्य हा त्यांचा प्रवास असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक म्हणून ते 20 वर्षांपासून कार्यरत आहेत. थोड्या फार प्रमाणात शिल्लक असलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बळावर आपण पक्षाने आदेश दिल्यास नक्की लढू अशी माहिती मधुसूदन हरणे यांनी तभा सोबत बोलताना दिली.
Powered By Sangraha 9.0