वर्धा, हिंगणघाट उबाठा गटासाठी आग्रही

निलेश धुमाळ यांची पत्रपरिषदेत माहिती

    दिनांक :22-Oct-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा,
Nilesh Dhumal conference महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात जास्त जागांवर लढत आहेत. असे असताना आम्ही वर्धा आणि हिंगणघाट विधानसभा मतदार संघासाठी आग्रही असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी आज सोमवार 21 रोजी गांधी कॉम्प्लेक्स येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तालुका आणि जिल्ह्याचा आढावा घेण्यात येत आहे. निवडणुकीसाठी वर्धा मतदार संघाची बांधणी झाली असून आमची यंत्रणा सज्ज आहे. महायुती असताना हिंगणघाट मतदार संघ हा शिवसेनेकडेच होता. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही वर्धा आणि हिंगणघाट मतदार संघ मागितला आहे. वर्धेतून 3 ते 4 तर हिंगणघाट मतदार संघातून आठ शिवसैनिक लढण्यास इच्छूक आहेत. सध्या वर्धेतून वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे आणि सेलू येथील स्नेहल देवतारे यांची नावे आम्ही पक्षप्रमुखांकडे पाठविली आहेत.
 
 
 
nagatafs
 
भारतीय जनता पार्टीला सत्तेतून हद्दपार करायचे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक आम्ही महाविकास आघाडीत राहून एकोप्याने लढलो. विधानसभाही आम्ही एकाच छताखाली लढणार आहोत, असेही धुमाळ यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघापैकी एकही जागा उबाठा गटाला न मिळाल्यास तुमची भूमिका काय, असा प्रश्‍नविचारला असता काँग्रेस विदर्भातील जागा उबाठा गटाला सोडण्यास तयार नाही. Nilesh Dhumal conference यामुळे शिवसैनिकांचा हिरमोड होईल. मात्र, महाविकास आघाडीत असल्याने पक्षप्रमुख जो आदेश देईल, त्यावर काम करू, असेही ते म्हणाले. दरम्यान, चारही विधानसभा क्षेत्रात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका सुरू असून निवडणुकीची रणनीती आखण्यात येत असल्याचे जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी युवासेना विस्तारक विक्रम राठोड, वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांची उपस्थिती होती.