उत्तर नागपूरात संविधान जागर मेळावा

    दिनांक :22-Oct-2024
Total Views |
नागपूर ,
Pachpavali Nagpur ''आरक्षण व संविधान धोक्याच्या नावाखाली समाजाची माथी भडकवून ,आपल्याला टार्गेट करून बदनाम करण्याचं विरोधकाचं षडयंत्र अजूनही सुरू आहे, याउलट केंद्र व राज्य सरकारने वंचितांसाठी मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत रोजगार, SC लघुउद्योजगाकडून शासकीय खरेदी , रमाबाई निवास योजना , विश्वकर्मा योजना इत्यादी द्वारे आंबेडकरी जनतेची महत्त्वपूर्ण कामे केलेली आहे,'' असे विचार सुनील किटकरू यांनी सामाजिक संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनाच्या वतीने समाजातील अनुसूचित जाती जमाती व वंचित घटकांचे प्रश्न शासकीय योजना यासंदर्भात चर्चा संवाद करण्यासाठी संस्था संघटनाच्या प्रतिनिधीचा सामाजिक संवाद मेळावा २ १ ऑक्टोबर रोजी पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयाच्या सभागृहात सामाजिक समरसता प्रमुख शंकर वानखेडे यांच्या अध्यक्षतेत पार पडला.
 
 
 
789
 
 
विवेक विचार मंचचे अतुल शेंडे व राहुल मून यांनी उपस्थिताशी संवाद साधला.Pachpavali Nagpur व्यासपीठावर माजी आमदार मिलिंद माने ,माजी नगरसेवक संदीप गवई, सतीश सिरसवान, नेताजी गजभिये, रमेश वानखेडे यांची उपस्थिती होती.शंकर मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. मोहिनी रामटेके यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाला वस्तीतील अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.
सौजन्य:सुरेश विंचूरकर,संपर्क मित्र