वर्धा भाजपा चारही विधानसभांची सुत्रं दिवेंच्या हाती

22 Oct 2024 10:15:01
तभा वृत्तसेवा
वर्धा,
Wardha BJP वर्धा जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकारणाचा इतिहास पाठ असलेले आणि भाजपावर पकड असलेले सुधीर दिवे यांच्याकडे वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी आणि आर्वी या चारही विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ते संकटमोचक ठरले आहेत. जिल्ह्यात वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाची सत्ता आहे. या तीन मतदार संघासह देवळी विधानसभेतही भाजपाने उमेदवारी दिली. लोकसभा निडणुकीत झालेल्या चुकांची काळजी घेण्यात येत आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या नेतृत्वात पक्षाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत वादांसह विविध प्रश्‍नांची जाण दिवे यांना आहे. निवडणुका हाताळण्याचा दांडगा अनुभव असलेले सुधीर दिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्धेतील चारही मतदार संघात आम्ही लढत आहोत. त्यापैकी तीन उमेदवार जाहीर झाले आहेत. आर्वीतील तिढा भाजपा वरिष्ठ नेते सोडवणार आहेत. आपल्यापरिने आपण आर्वी सामंज्यस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु, पक्ष नेतृत्व जे ठरवेल तेच होईल, असे त्यांनी सांगितले.
 
 
dive
 
वर्धा, देवळी व हिंगणघाट या तीनही मतदारसंघातील उमेदवार आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. वर्धा व हिंगणघाट मतदार संघातील विकास कामं ही आमची जमेची बाजू आहे तर देवळीत विद्यमान आमदार रणजित कांबळे यांच्याविषयी असलेला प्रचंड असंतोष, Wardha BJP अ‍ॅड. चारूलता टोकस यांना पक्षाने डावलल्याने त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आम्हाला देवळीत फायद्याची ठरणार आहे. आपण चारही मतदार संघात नियोजन केलेले आहे. एकदा उमेदवारांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना विश्‍वास निर्माण करून काम करू. चारही जागांवर भाजपाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असे दिवे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0