अर्जुनी विधानसभा क्षेत्रात उमेदवारींवरुन घमासान!

22 Oct 2024 10:34:55
सुरेंद्रकुमार ठवरे
अर्जुनी मोर,
Who will be MLA येथील विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीचा घटक पक्ष भाजपाने 99 उमेदवारांची यादी जाहिर केली. यात गोंदिया जिल्ह्यातील चार पैकी तिन मतदार संघात उमेदवार जाहिर केले. त्यामुळे येथील विधानसभा क्षेत्र हा राष्ट्रवादी कॉग्रसला जाणार हे निश्‍चीत समजले जात आहे. उमेदवार कोण? हा सस्पेन्स कायम आहे. मविआतील कोणत्या पक्षाला जागा द्यायची व उमेदवार कोण राहणार या पेच कायम आहे. मतदारसंघातील राजकीय दिवसेंदिवस तापत झाले आहे. गत निवडणुकीत वेगळे लढलेले पक्ष आता एकत्र आले असले, तरी तिकीट वाटपावरून घमासान सुरू आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी दोन वेळा येथून प्रतिनिधीत्व करणारे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनीही येथून दावा ठोकला आहे. बडोलेंनी 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रामलाल नंदागवळी यांचा 16,307 मतांनी पराभव केला होता. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी त्यांचा 718 मतांनी पराभव केला.
 
 
gondiya
 
 
पराभवानंतरही बडोलेंनी जनसंपर्क कायम ठेवला. आता पुन्हा निवडणुकीत उतरायची तयारी केली आहे. विद्यमान आ. चंद्रिकापुरे यांच्याही उमेदवारीची चर्चा आहे. Who will be MLA त्यांचा कार्यकाळ कार्यक्षम राहिला आहे. त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचे चिरंजीव डॉ. सुगत चंद्रीकापुरे यांचे नावही चर्चेत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षात तिकीट वाटपावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून दिलीप बन्सोड, अजय लांजेवार, डॉ. भारत लाडे, नुतन दहिवले यांचीही नावे चर्चेत आहेत. आघाडीत तिकीट कुणाला मिळणार यावर अद्याप कोणतीही स्पष्टता झाली नाही, त्यामुळे सस्पेन्स आणखी वाढला आहे.
 
 
बडोलेंना भाजपने उमेदवारी न दिल्यास बंडखोरीची शक्यता असल्याचे मत राजकीय विश्‍लेषकांचे आहे. राष्ट्रवादी (शप) कडून मिथुन मेश्राम यांनी तयारी केली आहे. ते गत काही महिन्यापासून सक्रीय होत शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मोर्चे काढले, निवेदने दिली. Who will be MLA लोकप्रतिनिधी, अधिकार्‍यांशी भेटी घेऊन चर्चा केली. तेही तिकीट मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निता साखरे, किरण कटारे, विजय खोब्रागडे हेही आस लावुन आहेत. काँग्रेसकडून अजय लांजेवार यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहे. लांजेवार यांनी विविध निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक लढवण्याचा अनुभव असलेले राजकारणी आहेत, त्यामुळे त्यांची उमेदवारी काँग्रेससाठी महत्वाची ठरू शकते.
राजकीय सस्पेन्स आणि मतदारसंघातील अस्थिरता
या मतदारसंघात राजकीय अस्थिरता वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांमध्ये तिकीटावरून संघर्ष असल्याने मतदारांमध्ये अनिश्‍चितता आहे. या सस्पेन्समुळे मतदारांची उत्सुकता वाढली आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार अंतिमतः निवडणुकीसाठी उतरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विकासकामे आणि लोकांचे मत
येथील मतदारसंघात विकासकामांची परिस्थिती पाहता, राजकुमार बडोले आणि मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपापल्या कार्यकाळात अनेक महत्वाची कामे केली आहेत. बडोले यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणून अनेक उपक्रम राबवले, तर चंद्रिकापुरे यांनी स्थानिक विकासावर भर दिला. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये आपापल्या नेत्याविषयी चांगली भावना आहे.
Powered By Sangraha 9.0