'हा' उच्चशिक्षित तरुण उतरणार निवडणुकीच्या मैदानात?

    दिनांक :22-Oct-2024
Total Views |
अकोला
Kaustubh Deshmukh सध्या राज्याचं राजकारण विधानसभा निवडणूक तिकिटासाठी चांगलेच तापले आहे. सुरवातीपासून राजकारणात असलेले उमेदवार आपल्या नेत्यांच्या घराचे उंबरठे उमेदवारीसाठी झिजवतांना दिसत आहे. मात्र, आजची  नवतरुणाई काहीशी उमेदवारी, निवडणूक आणि राजकारण यापासून दूरच राहण्याचा विचार करतेय. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागणाऱ्या एका तरुण उमेदवाराने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. एका उच्चशिक्षित अभियंता असलेल्या शेतकरी तरुणाने अकोला पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडे  उमेदवारी मागितली असल्याचे बातम्या आहे.

Kaustubh Deshmukh 
कौस्तुभ देशमुख असे या तरुणाचं नाव आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयात 'एम.टेक' झालेला कौस्तुभ सध्या अकोला शहरालगतच्या डोंगरगावात आधुनिक शेती करतोय. मात्र, शेती करत असतानाच शेती, शेतकरी आणि तरुणाईच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याला राजकारणाच्या रणांगणात उतरायचंय. यासाठी त्याने अकोला पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवाराची मागणी केलीये. Kaustubh Deshmukh अकोला जिल्ह्यातील एकूण पाच विधानसभा मतदारसंघांपैकी बाळापुर आणि मुर्तीजापुरात वंचितने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर अकोला पूर्व मतदारसंघात कौस्तुभ देशमुख यांच्यासह पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. असे असले तरी या शर्यतीत उच्चशिक्षित अभियंता कौस्तुभ देशमुख याची वर्णी लागते का? आणि मतदारराजा नवतरुणाईला राज्याच्या राजकारणात साथ देते का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
कोण आहे कौस्तुभ देशमुख?
कौस्तुभ देशमुख हे सध्या 32 वर्षांचे आहेत. त्याचे वडील अकोला जिल्हा परिषदेतून पशुसंवर्धन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. नागपुरातील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगमध्ये बी. ई. एम. टेक. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण कौस्तुभ ने घेतले आहे. शिक्षणानंतर काही काळ अकोला आणि अमरावतीत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही कौस्तुभ ने नोकरी केली आहे. तर त्यानंतर त्याने पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. शहरालगतच्या डोंगरगाव येथील शेतीत त्याने अनेक नवे प्रयोग केलेत. Kaustubh Deshmukh शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड म्हणून कौस्तुभ ने आराध्या पोल्ट्री उद्योग आणि आराध्या दुध डेअरीच्या माध्यमातून काम सुरू केलं. तसेच 2020 मध्ये अकोला जिल्हा परिषदेसाठी बाभूळगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी मिळवत त्याने 1200 मते घेतली आहेत. कौस्तुभ यांचे आजी-आजोबा शंकरराव आणि रमाबाई हे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. तर त्यांचे पणजोबा कृष्णरावबापू देशमुख गारडगावकर हे आमदार राहिले आहेत. त्यांच्या आई माधुरी देशमुख यांनी दोनदा अकोला महापालिकेची निवडणूक लढवली आहे. तर स्वतः कौस्तुभ यांनी एकदा अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे शेती करत असतानाही या कुटुंबाचा राजकारणाशी अगदी जवळचा संबंध राहिला आहे.
या मतदारसंघात मोठी ताकद असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अद्याप स्पष्ट नाहीय. Kaustubh Deshmukh वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकूंद भिरड, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक डॉ. संतोष हुशे आणि डॉ. हर्षवर्धन मालोकार यांची नावं चर्चेत आहेत. अनेक दिग्गज नेत्यांच्या गर्दीत कौस्तुभ देशमुख यांना वंचित बहुजन आघाडी उमेदवारी देते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं‌ आहे. सध्याची तरुणाई करिअरच्या मळलेल्या वाटा सोडून राजकारणाकडे जाऊ इच्छित नसताना कौस्तुभ देशमुख यांनी उमेदवारी मागण्याचे दाखवलेले धाडस हे निश्चितच वेगळे म्हणावे लागेल.