शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व होळी मित्र परिवारांची संयुक्त पत्रपरिषद

22 Oct 2024 18:42:05
गडचिरोली
press confarance भाजपने गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांना दिल्यास ते निवडून येतील. त्यामुळे आमचा पाठिंबा हा डॉ. होळींनाच असल्याचे मंगळवारी घेण्यात आलेल्या एका पत्रपरिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी घोषीत केले आहे.
होळी यांना भाजपचे तिकिट मिळावे, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व भाजपमधील होळींच्या मित्रमंडळींनी आज शक्तीप्रदर्शन करुन येथील प्रेस क्लब सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रपरिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, राष्ट्रवादीचे डॉ. तामदेव दुधबळे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, भाजपच्या जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, भाजपचे जिल्हा सचिव विलास दशमुख, साईनाथ बुरांडे, मधुकर भांडेकर, दिलीप चलाख, भाजपचे शहर अध्यक्ष मुक्तेश्‍वर काटवे, वैभव भिवापुरे, यश गण्यारपवार, प्रतिभा चौधरी व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 press
 
 
यावेळी बोलताना press confarance हेमंत जंबेवार म्हणाले, गडचिरोली विधानसभेतून काँग्रेसला टक्कर देण्यासाठी डॉ. होळी हेच एकमेव उमेदवार असून होळी यांना संधी दिल्यास ते परत निवडून येतील. येत्या २५ तारखेला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शिंदे गट) व भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्याला २५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले. भाजपने कुणाला तिकिट द्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. मात्र, मित्र पक्ष म्हणून जो उमेवार विजयी होऊ शकतो व महायुतीचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्या उमेदवाराच्या आम्ही पाठीशी आहोत, हे भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचा केवळ आजच्या पत्रपरिषदेचा उद्देश असल्याचे जंबेवार म्हणाले. त्यामुळे पक्षाने होळी यांनाच तिकिट द्यावे, अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह भाजपमधील काही पदाधिकार्‍यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0