रा. स्व. संघाची शाखा म्हणजे आदर्श व्यक्ति निर्माणाचा कारखाना : प्रा. जयंतराव खरवडे

संघाची शाखा म्हणजे आदर्श व्यक्ती निर्माणाचा कारखाना

    दिनांक :22-Oct-2024
Total Views |
चामोर्शी
vijayadashami festival संघाच्या शाखेत शारीरिक, मानसिक तथा बौद्धिक क्षमतांचा विकास साधला जात जातो. समाज, देश व धर्माच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेले संघटन निर्माण करून राष्ट्राला परमवैभवावर नेण्याचा, राष्ट्राला विश्‍वगुरु बनविण्याच्या निर्धाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा म्हणजे आदर्श व्यक्ती निर्माणाचा कारखाना असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर विभाग संघचालक प्रा. जयंतराव खरवडे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चामोर्शी शहराचा शस्त्रपूजन तथा विजयादशमी उत्सव स्थानिक नगर पंचायतच्या पटांगणावर शनिवारला पार पडला, यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून वाल्मीकी मंदिराचे सचिव विलास सरपे, तालुका संघचालक किशोर ओल्लारवार व जिल्हा कार्यवाह अविनाश तालापल्लीवार उपस्थित होते.
 
  
rss
 
 
 पुढे बोलताना vijayadashami festival  प्रा. खरवडे यांनी, आपल्या हिंदू संस्कृतीला बाधा न पोहोचवता आपले हिंदू सण, उत्सव कशाप्रकारे साजरे करता येईल याचा देखील विचार प्रत्येकांनी करायला हवा असेही विचार त्यांनी मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश तालापल्लीवार तर संचालन तुषार दुधबावरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय तालुका कार्यवाह देविदास कोहळे यांनी केले. याप्रसंगी शहरातील मातृशक्ती तथा सज्जनशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रबंधक म्हणून विजय कोमेरवार, संजय बंडावार, यश सोमनकर, आकाश पिपरे, परमानंद तागडे, प्रेम सोमनकर, नैताम, शंतनू कवठे, मंथन गभणे व आदींनी भूमिका बजावली.
‘चाहे आंधी vijayadashami festival आए, बारीश या तुफान, संघ का काम नही रुकता’ या वाक्याची प्रचिती यावेळी समस्त चामोर्शी शहरवासीयांना प्रत्यक्षात अनुभवास मिळाली. कारण अतिशय वेगवान असा वारा वाहत असतांना आणि मुसळधार पाऊस चालू असतांना देखील सायंकाळी ५.३० वाजता नगरपंचायतच्या प्रांगणामधून गणवेशधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन निघाले. सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले तर वैयक्तिक गित आकाश पिपरे, सांघिक गीत प्रखर एडलावार, सुभाषित दीप नैताम व अमृत वचन तन्मय भांडेकर यांनी सादर केले.