स्वातंत्र्य समरातील धगधगती ज्वाळा

    दिनांक :24-Oct-2024
Total Views |
भगिनी निवेदिता
Bhagini Nivedita : भगिनी निवेदिता यांचे आधीचे नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबल होते. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील डानगॅनन नावाच्या एका लहानशा शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सॅम्युअल रिचमंड नोबल आणि आईचे नाव मेरी इसाबेल होते. त्या केवळ दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू वडिलांच्या पश्चात निवेदितांचे पालनपोषण त्यांचे आजोबा हॅमिल्टन यांनी केले. हॅमिल्टन हे आयरिश स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख नेते होते.
 
 
Nivedita-4
 
वडिलांच्या आणि पूर्वजांच्या प्रभावामुळे तसेच आजोबांच्या आदर्शांच्या प्रेरणेमुळे मार्गारेट यांच्या व्यक्तिमत्त्वात सत्यनिष्ठा, धर्माविषयी प्रेम, देशाप्रती आत्मभान आणि राजकारणावरील निष्ठा यांचा समन्वय दिसत होता. शालेय शिक्षण संपल्यानंतर वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी मार्गारेटने जीवन स्वीकारले.काही दिवसांतच त्यांनी विम्बल्डनमध्ये शाळा उघडली आणि स्वतःच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. अल्पावधीतच एक उत्तम शिक्षिका म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन करून त्यांनी प्रत्यक्ष अर्थात खर्‍या धर्मजीवनाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. पण कोणत्याही प्रकारे शांती न मिळाल्याने त्या हळूहळू निराश होऊ लागल्या.
 
 
स्वामी भेट
भारतीय संन्यासी स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान आणि विचार यांचा प्रत्यक्ष अंगीकार केल्यानंतर, स्वामीजींच्या विचारांनुसार मार्गक्रमण केल्यानंतर Bhagini Nivedita मार्गारेट नोबल यांच्या जीवनातील ही अस्वस्थता, अशांती कायमची दूर झाली. नोव्हेंबर १८९६ मध्ये एका संध्याकाळी स्वामी विवेकानंदांनी लंडनमधील एका कुटुंबाकडे आयोजित कार्यक्रमात वेदांत तत्त्वज्ञान समजावून सांगितले. येथेच मार्गारेट नोबल यांनी स्वामीजींना पहिल्यांदा आत्मविश्वासाने परिपूर्ण तेजस्वी हिंदू वीर संन्याशाचे धार्मिक विवेचन आणि त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने त्या मंत्रमुग्ध झाल्या. यानंतर स्वामीजींनी लंडनमध्ये विविध ठिकाणी भाषणे दिली, तसेच प्रश्नोत्तर सत्रे झाली. या सर्व भाषणांना आणि सत्रांना मार्गारेट उपस्थित होत्या आणि स्वामीजींचे प्रत्येक भाषण, प्रत्येक व्याख्यान तसेच प्रवचन मोठ्या आवडीने व मन लावून ऐकत होत्या. एका मागून एक प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या मनातील सर्व शंका, सर्व संशय दूर करायचे होते आणि मनातील प्रश्नांबाबतच त्या सातत्याने विचार करायच्या. आपण ज्या धर्मजीवनाचा शोध घेत आहोत, ज्या विषयावरून संभ्रमात आहोत त्याबाबत हे हिंदू संन्यासी अर्थात स्वामी विवेकानंदच सुयोग्य मार्गदर्शन करू शकतील व आपल्या मनातील सर्व शंका, सर्व समाधानकारक उत्तरे देण्याची क्षमता केवळ या हिंदू संन्याशातच आहे, याची मार्गारेट नोबल यांना पूर्णपणे खात्री पटली.
 
 
Bhagini Nivedita : मार्गारेटची सचोटी, दृढनिश्चय आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मानवांप्रती तिच्या सहानुभूतीपूर्ण मनाचीही हळूहळू स्वामीजींना जाणीव झाली. पराधीन भारताची दुर्दशा आणि भारतातील सामान्य लोकांचे कष्ट, हालअपेष्टा पाहून स्वामीजी अतिशय दु:खी होत असत. भारताची प्रगती करायची तर सर्वसामान्य लोकांची आणि स्त्रियांची प्रगती झाली पाहिजे, असे त्यांचे मत होते. महिलांच्या प्रगतीचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना शिक्षित करणे, स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रचार-प्रसार करणे. शिक्षणाच्या प्राप्तीमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि मग त्या स्वत:च स्वतःच्या समस्या सोडविण्यास सक्षम, समर्थ होतील, असे स्वामीजींना प्रकर्षाने वाटायचे. या कार्यासाठी मार्गारेट अतिशय योग्य व्यक्ती असे स्वामीजींना वाटले. त्यांनी भारतातील सामान्य जनतेला विशेषतः महिलांना शिक्षण देण्याचे आवाहन केले. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ‘माझा दृढ विश्वास आहे की भारताच्या कार्यात तुमचे उज्ज्वल भवितव्य आहे, भारतासाठी, विशेषत: भारतीय महिलांसाठी, पुरुषांपेक्षा स्त्रीची-एका सिंहिणीची गरज आहे. आपला देश, आपले कुटुंब आणि आपले प्रतिष्ठित जीवन सर्वकाही सोडून मार्गारेट नोबल स्वामीजींच्या भारत घडविण्याच्या कार्यात योगदान देण्यासाठी २८ जानेवारी १८९८ रोजी भारतात दाखल झाली. भारतात आल्यानंतर काही दिवसांतच त्यांना श्री माँ सारदा देवींचे दर्शन झाले. मार्गारेटने माताजींमध्ये प्रेम, पावित्र्य, माधुर्य, साधेपणा आणि ज्ञानाचे मूर्तिमंत रूप अनुभवले. श्री माँ अर्थात सारदा देवी एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे आणि ती त्या विधात्याची, परमेश्वराची अद्भुत आहे हे देखील तिला जाणवले. त्यांनी स्वत:ला माताजींची लाडकी कन्या मानण्यात धन्यता मानली. काही दिवसांनी स्वामी विवेकानंदांनी मार्गारेट नोबलला ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा दिली आणि तिचे नाव Bhagini Nivedita ‘निवेदिता’ ठेवले. त्यांनी आयुष्यभर कठोर संयम पाळण्याची आणि भगवान बुद्धांप्रमाणे मानवजातीच्या सेवेत स्वतःला अर्पण करण्याची आज्ञा दिली.
 
 
मिशन आणि ध्येय
भारतात आल्यानंतर Bhagini Nivedita भगिनी यांचे एकमेव ध्येय होते आणि ते म्हणजे भारतमातेची सेवा करणे. ‘‘भारताच्या कल्याणातच विश्वाचे कल्याण आहे. भारताचा आध्यात्मिक आदर्श संपूर्ण जगाला सदैव कल्याणाचा मार्ग दाखवेल,’’ या स्वामीजींच्या विधानावर भगिनी निवेदितांचा पूर्ण विश्वास होता. म्हणूनच भारताची सेवा म्हणजेच संपूर्ण मानवजातीची सेवा या भावनेतून त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला. स्वामीजींच्या इच्छेनुसार त्यांनी (कोलकाता) येथील बोसपाडा लेनमध्ये महिला विद्यालयाची स्थापना करून राष्ट्रीय आदर्शानुसार स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू केले. ४ जुलै १९०२ रोजी स्वामीजींनी महासमाधी घेतली. Bhagini Nivedita भगिनी निवेदितांना शोक करण्याचीही संधी मिळाली नाही. कारण त्यांची अनेक अपूर्ण कामे पूर्ण व्हायची होती. भारताला सर्व प्रकारे जागृत करावे लागेल, हे त्यांनी जाणले. भारतमाता हीच त्यांच्या सनातन पूज्य देवी होती. भारतात राहून भगिनी निवेदितांनी ब्रिटीश राजवटीच्या शोषणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. इंग्रजांकडून भारतीयांचा नेहमीच होणारा अनादर, अपमान आणि दडपशाही यामुळे त्यांना अतिशय संताप येऊन त्या व्यथित होत असत. पारतंत्र्य हाच भारताच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे, हे त्यांच्या स्पष्टपणे लक्षात आले. भारतीयांच्या सर्वप्रकारच्या दुर्बलतेला ही सत्ताच कारणीभूत आहे, असे त्यांना मनापासून वाटत होते. भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्याच्या प्रबळ इच्छेमुळे त्यांनी राजकीय क्षेत्राशी आपले नाते जोडले. स्वामी विवेकानंदांच्या आदेशानुसार रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनला राजकारणाशी, राजकीय क्षेत्राशी संपर्क करण्यास मनाई होती. पण भगिनी निवेदितांच्या दृष्टीने भारताचे स्वातंत्र्य त्यावेळी सर्वांत महत्त्वाचे होते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राशी न ठेवणे त्यांना कोणत्याही प्रकारे शक्य नव्हते. त्यामुळे रामकृष्ण मिशनशी थेट संपर्क तोडणे हाच उपाय होता. असे करणे मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायी असले तरी भगिनी निवेदितांनी तेच केले. पण अंतरंग संपर्क कधीच तुटला नाही. यामुळेच संघजननी श्री माँ सारदादेवी, रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी ब्रह्मानंदजी महाराज, त्यांचे गुरुबंधू आणि मठातील सर्व मंडळींशी निवेदितांचे प्रेम आणि भक्तीचे आजीवन नाते होते. त्या आपला परिचय ‘रामकृष्ण-विवेकानंदांची निवेदिता’ अशी करून देत असत.
 
 
स्वामी विवेकानंदांनी ज्या महान भारताचे स्वप्न पाहिले होते त्याला मूर्तस्वरूप देण्यासाठी Bhagini Nivedita भगिनी निवेदिता तीव्र उत्साहाने भारून गेल्या. संपूर्ण भारतभर राष्ट्रवादाची प्रबळ भावना जागृत करण्यासाठी त्यांनी संपूर्ण शक्तिनिशी प्रयत्न सुरू केले. भगिनी निवेदितांच्या राष्ट्रवाद म्हणजे शिक्षण, साहित्य, विज्ञान, इतिहास, शिल्पकला, लोकसंस्कृती इत्यादी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत ‘स्व’ ची देशभक्तीची भावना.
 
 
स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन त्यांनी भारतात ठिकठिकाणी भाषणे देण्यासाठी दौरे सुरू केले. आपल्या प्रेरक भाषणांतून त्यांनी सर्वसामान्य जनतेला स्वामीजींचे आदर्श समजावून सांगायला सुरुवात केली. त्यांनी सर्व प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक भेदभाव विसरून एकजुटीने सेवा करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. नि:स्वार्थी वृत्ती, सर्वोच्च त्याग आणि तपश्चर्या यांचे मूर्त स्वरूप असलेल्या Bhagini Nivedita भगिनी निवेदिता यांचे हे आंतरिक आवाहन सर्वसामान्यांच्या हृदयाला भिडले. अनेक लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली. विशेषतः विद्यार्थी आणि तरुणांशी त्या अधिकाधिक संवाद साधत होत्या, संपर्क करीत होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्याचा आणि राहण्याचा सल्ला दिला.
 
 
राष्ट्रवादाबद्दल भगिनी निवेदिता यांचे विचार
* कर्मयोगिन’ मासिकाच्या एका अंकात Bhagini Nivedita भगिनी निवेदिता यांचे एक वक्तव्य प्रकाशित झाले होते, जे त्यांचे वेद-वाक्य म्हणून स्वीकारले गेले आहे. ते खालीलप्रमाणे होते.
* माझा विश्वास आहे की भारत एक आहे, अखंड आहे आणि अजेय आहे.
* राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा आधार घर, समान हित आणि समान स्नेह आहे.
* वेद आणि उपनिषदांमध्ये आणि विविध धर्म आणि साम्राज्यांमध्ये आणि विद्वानांचे ज्ञान आणि संतांच्या चिंतनातून जी शक्ती व्यक्त झाली आहे, तीच शक्ती आमच्यामध्ये पुन्हा प्रकट झाली आहे आणि आज ती राष्ट्रवाद म्हणून ओळखली जाते, असा माझा विश्वास आहे.
* माझा असाही विश्वास की भारताचा वर्तमान त्याच्या भूतकाळाशी अविभाज्यपणे जोडलेला आहे, ज्यामुळे त्याचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे.
* हे राष्ट्रीयत्व, माझ्याकडे या, आनंद असो वा दुःख, सन्मान असो किंवा लज्जा, कुठल्याही स्वरूपात मी तुझे स्वागत करण्यास तयार आहे. तू माझा स्वीकार कर.
* भारतवर्ष ही भगिनी निवेदितांसाठी एक पुण्यभूमी होती. त्यांच्यासाठी भारताचा मनुष्य पुण्यात्मा होता. एके दिवशी त्यांच्या घरी दूध देणार्‍या गवळ्याला त्यांच्याकडून धर्माशी संबंधित काही उपदेश ऐकण्याची इच्छा होती. त्याचे बोलणे ऐकून निवेदितांना थोडा संकोच वाटला. जणू त्या स्वतःला गुन्हेगार समजत होत्या. त्या गवळ्याला पुन्हा पुन्हा नमन करीत त्या म्हणाल्या, तू भारतवासी आहेस, तुला माझ्याकडून कुठला उपदेश ऐकायचा आहे? तुम्हाला नाही अशी कोणती गोष्ट आहे? तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे वंशज आहात, मी तुम्हाला प्रणाम करते. किंबहुना, भारताच्या स्वातंत्र्याच्या संग्रामाप्रती निवेदितांची जी सखोल बांधिलकी होती त्यातून त्या भारतीय जीवनपद्धतीशी पूर्णपणे एकरूप झाल्या होत्या, हे स्पष्ट होते.
 
 
एक समर्पित स्वातंत्र्यसैनिक
* योगी अरविंद घोष यांनी नियुक्त केलेल्या राजकीय समितीच्या सदस्यांपैकी त्या एक होत्या, ज्यांना क्रांतिकारकांच्या विखुरलेल्या गटांना एकत्र करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
* क्या आपल्या निवासस्थानी वैज्ञानिक, कलावंत, पत्रकार आणि क्रांतिकारकांसाठी रविवार मिलन समारंभाचे आयोजन करीत असत. त्यातील एक प्रमुख नाव होते भाई बारिंद्र घोष. बारिंद्र घोष हे योगी अरविंद घोष यांचे लहान बंधू होते.
* १९०२ भारताच्या राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेचा गळा घोटण्यासाठी स्थापन केलेल्या ’विद्यापीठ आयोग’चा निषेध केला.
* प्रसिद्ध क्रांतिकारक आनंद मोहन बोस यांनी १९०५ मध्ये बंगालचे विभाजन करण्याच्या ब्रिटिश सरकारच्या निर्णयाविरुद्ध मांडलेल्या प्रस्तावाला त्यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये जोरदार पाठिंबा दिला.
* निवेदिता या अतिशय विद्वान लेखिका होत्या. त्यांनी प्रबुद्ध भारत, संध्या आणि न्यू असंख्य लेख लिहिले.
* योगी अरविंद घोष, त्यांचे बंधू बरिंद्र घोष आणि स्वामी विवेकानंद यांचे धाकटे बंधू भूपेंद्र नाथ दत्त यांनी चालवलेले युगांतर हे क्रांतिकारी वृत्तपत्राची योजना १२ मार्च १९०६ रोजी निवेदितांच्या निवासस्थानी आखण्यात आली होती.
* भूपेंद्र नाथ दत्त यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि १० रुपये दंड ठोठावण्यात तेव्हा त्यांनी युगांतराच्या प्रकाशनात खंड पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.
* त्यांनी देशातीलच नव्हे तर परदेशातील क्रांतिकारकांना देखील मदत केली. १९०७ मध्ये त्या इंग्लंडला गेल्या आणि ब्रिटिश खासदारांच्या भेटी आणि मुलाखतींच्या बातम्या त्यांनी प्रकाशित केल्या.
* त्यांनी भूपेंद्रनाथ दत्ता, तारक दत्ता यांसारख्या अनेक क्रांतिकारकांना अज्ञातवासात मदत केली आणि क्रांतिकारी मासिकांच्या अखंड प्रकाशन आणि वितरणासाठी निधी गोळा केला.
भगिनी निवेदिता या एक अद्वितीय प्रतिभा असलेली स्त्री होत्या. स्वामी विवेकानंदांच्या परिवर्तन प्रक्रियेतील कठोर परिश्रमांनी त्यांचे रूपांतर देशभक्तात झाले. त्यांनी आपली ओळख भारतीयत्वाच्या भावनेत विलीन केली.
संदर्भ ग्रंथ
* Bhagini Nivedita :  सिस्टर निवेदिता, वसुधा चक्रवर्ती, अनुवाद : सुरेंद्र अरोड़ा, नॅशनल बुक इंडिया
* भारत की निवेदिता, रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर, गोल पार्क, कोलकाता
* द डेडिकेटेड: ए बायोग्रफी ऑफ निवेदिता, रेमंड, लेज़ेल (१९५३) जॉन डे कंपनी, न्यूयॉर्क
* सिस्टर निवेदिता के संपूर्ण कार्य, निवेदिता गर्ल्स स्कूल, कलकत्ता
(साभार : विचार विनिमय न्यास दिल्ली)