उद्धव ठाकरेंना हात जोडून, कोणता नेता गेला निघून...

24 Oct 2024 18:23:34
मुंबई,
Maharashtra Assembly Elections : अवघ्या महाराष्ट्राला आता निवडणुकीचा ज्वर चढला आहे. पक्षांतर, दावे-प्रतिदावे आणि आरोपांना ऊत आला आहे. निवडणुकीसाठी नक्की कोणाला तिकीट द्यायचं? असा पेच पक्षश्रेष्ठींसमोर उभा ठाकतो आहे. या सगळ्या ज्येष्ठ शिवसैनिक सुधीर साळवी यांच्या नम्र कृतीने पक्षधोरणाला सणसणीत चपराक लगावली आहे. मातोश्री या निवासस्थानी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरींना संधी देत असल्याची घोषणा केली आणि दुखावलेला शिवसैनिक मातोश्रीबाहेर पडला.
 
 
THAKREY
 
 
दरम्यान, मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघ शिवडीतून ठाकरेंनी पुन्हा एकदा अजय चौधरींचा मैदानात उतरवलं आहे. ‘संकटकाळात सर्वजण सोडून जात अजय चौधरी माझ्यासोबत राहिले. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देत आहोत,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चौधरींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. पक्षश्रेष्ठींच्या या बोलण्याने दुखावलेल्या सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला आणि ते मातोश्रीबाहेर पडले. दरम्यान, आपण संघटनेसोबत एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करत असल्याचं साळवी यांनी माध्यमांना सांगितलं.
 
 
मातोश्रीवरून हा जाहीर झाल्यानंतर साळवी यांनी, उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला आणि ते बाहेर पडले. विधानसभेतील पाचपैकी पाच शाखाप्रमुखांसह युवासेना आणि महिला पदाधिकार्‍यांनी देखील सुधीर साळवींच्या नावाचा कौल दिला होता. पण, सेनेचे जुनेजाणते नेते अजय चौधरी हे बंडखोरीच्या काळातही उद्धव ठाकरेंसोबत थांबल्याचा मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरला. दरम्यान, शिवडी मतदारसंघात मनसेकडून बाळा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Powered By Sangraha 9.0