छगन भुजबळांची मालमत्ता ११.२० कोटींची, आठ खटले

25 Oct 2024 17:19:55
- पत्नीच्या नावे १६ कोटींची संपत्ती
 
नाशिक, 
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री Chhagan Bhujbal छगन भुजबळ यांच्याकडे असलेली एकूण मालमत्ता ११ कोटी २० लाख ४१ हजार रुपयांची असून, त्यांच्यावर २४ लाख ५६ हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता १६ कोटी ५३ लाख रुपयांची असून, त्यांच्या नावावर २१ लाख १० हजार २५० रुपयांचे कर्ज आहे. २०१९च्या तुलनेत भुजबळ यांची मालमत्ता ९ लाख रुपयांनी वाढली आहे. छगन भुजबळ यांच्याकडील जंगम संपत्ती १ कोटी ३२ लाख ६६ हजार २३५ रुपयांची असून, स्थावर संपत्ती ३२ लाख २ हजार ४९९ रुपयांची आहे. मीना भुजबळ यांच्या नावे २ कोटी ३८ लाख २९ हजार ५२ रुपयांची जंगम, तर ८६ लाख २१ हजार ५७२ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
 
 
Chhagan Bhujbal
 
Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्याकडे एक कार असून, त्यांच्या पत्नीच्या नावे टाटा पिकअप वाहन आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात भुजबळ यांनी ही माहिती दिली. याशिवाय भुजबळ यांच्याकडे ५८५ ग्रॅम सोने असून, त्याचे मूल्य ४२ लाख १२ हजार रुपये आहे. त्यांच्या पत्नी मीना यांच्याकडे ३२ लाख ७६ हजार रुपयांचे ४५५ ग्रॅम सोने, ४ लाख ३७ रुपयांची ५,१५० ग्रॅम चांदी तसेच २२ लाख ५ हजार रुपयांच्या अन्य मौल्यवान वस्तू आहेत. याशिवाय भुजबळ यांच्या नावे दोन ठिकाणी शेतजमिनी व दोन घरे आहेत. भुजबळ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या खटल्यांसह एकूण आठ खटले प्रलंबित असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0