बजाज ऑटोने आणली पल्सर एन १२५ स्पोर्ट बाईक

    दिनांक :26-Oct-2024
Total Views |
पुणे, 
Bajaj Pulsar N125 Sport Bike : बजाज ऑटो लिमिटेड या जगातील सर्वांत व्हॅल्यएबल टू-व्हीलर थ्री-व्हीलर कंपनीतर्फे पल्सर एन १२५ या पल्सर एन सीरिजमधील नवे मॉडेल बाजारात सादर करण्यात आली. नव्या युगातील डिझाईन आणि फन व स्पोर्टी परफॉर्मन्स असलेली ही बाईक आहे. पल्सर एन १२५ चालवताना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. हा ब्रॅण्ड भारतातील मोटरसायकलिंग सेगमेंटमध्ये आघाडीवर राहिला आहे. हा ब्रॅण्ड बाईक्सचे स्पोर्टी डिझाईन पॉवरफूल परफॉरमन्ससाठी ओळखला जातो.
 
 
Bajaj Pulsar
 
पल्सरचे भारतात ३ लाखांहून अधिक ग्राहक असून, पल्सर एन सीरिजमध्ये स्टाइल, रिफाईनमेंट आणि रोमांचक राईड क्वालिटी यांची सांगड घातली आहे. सोबतच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. नव्या एन १२५ मध्ये हेच कायम ठेवण्यात आले आहे. १२५ सीसी कॅटेगरीमधील महत्त्वाकांक्षी तरुण रायडर्ससाठी स्पोर्ट्स अधिक अ‍ॅक्सेसिबल आले आहे.
 
 
Bajaj Pulsar N125 Sport Bike : सुपर मोटार्ड प्रमाणांपासून प्रेरणा घेत पल्सर एन १२५ डिझाईन करण्यात आली आहे. त्यामुळे तिला एक जबरदस्त आणि लाईटवेट फॉर्म म्हणजे वजन कमी असून, कार्यक्षमता आणि मजबुती कायम राखण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गाड्यांमध्ये ही बाईक उठून दिसते. या बाईकच्या डिझाईन फिलॉसॉफीच्या केंद्रस्थानी तीन घटक आहेत. ते म्हणजे चपळता आणि शहरी लूक. क्लीन, शार्प लाईन्स आणि अ‍ॅग्रेसिव्ह स्टायलिंगमुळे एन१२५चे डिझाईन शहरातील वाहतुकीची कोंडी तोडत पुढे जाण्यासाठी परिपूर्ण आहे.