- मोहम्मद युनूस यांना इशारा
ढाका,
Mohammad Yunus : बांगलादेशात अल्पसंख्यकांना विशेषतः हिंदूंवर अत्याचार केले जात अल्पसंख्यकांवरील अत्याचारांच्या विरोधात आता आवाज उठवला जात आहे. बांगलादेशातील हिंदू अत्याचाराच्या विरोधात एकवटले आहेत. त्यांनी शुक्रवारी चटगाव येथील ऐतिहासिक लालदिघी मैदानात विशाल रॅली आयोजित केली.
शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतरची ही सर्वांत मोठी रॅली आहे. सनातन जागरण मंचाने ही रॅली आयोजित केली. बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख Mohammad Yunus मोहम्मद युनूस यांना इशारा दिला आहे. आम्हाला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या लाखो हिंदूंनी केली आहे. त्यांनी बांगलादेशच्या सरकारला अल्टिमेटम दिला आहे. मोहम्मद युनूस आमच्या आठ मागण्या पूर्ण करेपर्यंत आंदोलन कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राजधानी ढाक्यातही मोठे आंदोलन आयोजित केले जाईल, असे सनातन जागरण मंचाने सांगितले.
हिंदू समुदायाच्या मागण्या ऐकल्या असून, बांगलादेशच्या इतिहासात प्रथमच दुर्गापूजेसाठी दोन दिवसांच्या सुट्या देण्यात आल्या, असे बांगलादेशचे पर्यावरण मंत्री सैयद रिझवाना हसन यांनी सांगितले.
४८ जिल्ह्यांत हिंदूविरोधी हिंसाचार
विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर हिंदूंवर हल्ले सुरू झाले. या काळात बांगलादेशातील ४८ जिल्ह्यांतील २७८ ठिकाणी हल्ले झाले. मंदिरे फोडण्यात आली. त्यांची संपत्ती लुटण्यात आली. हिंदू शिक्षकांचे बळजबरीने राजीनामे घेण्यात आले.
कट्टरवाद्यांनी दिल्या धमक्या
नोबेल पुरस्कार विजेते Mohammad Yunus मोहम्मद युनूस यांनी ८ ऑगस्ट रोजी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी अल्पसंख्यकांना सुरक्षा दिली जाईल, अशी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या मुद्यावर चिंता केली होती. बांगलादेशातील जमात-ए-इस्लामीने हिंदूंना धमक्या दिल्या आहेत.
सनातन जागरण मंचाच्या आठ मागण्या
- अल्पसंख्यकांच्या विरोधातील हल्ल्यांच्या प्रकरणांत सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक खटले चालावे यासाठी न्यायाधिकरण स्थापन करा.
- हिंसाचारग्रस्त अल्पसंख्यकांना भरपाई देऊन पुनर्वसन करा.
- अल्पसंख्यकांना संरक्षण देण्यासाठी तातडीने कायदा लागू करा.
- अल्पसंख्यक मंत्रालय स्थापन करा.
- शैक्षणिक अल्पसंख्यकांची मंदिरे उभारा.
- हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन ट्रस्टला फाऊंडेशनमध्ये बदला.
- संपत्ती कायदा योग्य पद्धतीने लागू करा.
- संस्कृत आणि पाली शिक्षण मंडळाचे आधुनिकीकरण करा, दुर्गापूजेला पाच दिवसांची सुटी द्या.