प्रत्युत्तराचा धोका

26 Oct 2024 06:00:00
वेध
- अभिजित लिखिते
मागील काही काळापासून सुरक्षा दलांचा Naxalite नक्षलवाद्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव वाढला आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात त्यांना डोके वर काढण्याची संधी मिळणे दुरापास्त झाले. अलिकडेच गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएएफच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाड येथे पाच नक्षल्यांचा खात्मा केला. या चकमकींमुळे दलाचा विश्वास वाढत आहे, तर नक्षलवादी चळवळ कधी नव्हे इतकी दबावात आली आहे. एका पाठोपाठ मोठे नेते व साथीदारांच्या मृत्यूमुळे घटणारे मनुष्यबळ, जंगलांमधील वनवासींमध्ये कमी होत असलेली दहशत, त्याचा खंडणीवर होणारा परिणाम हे एकूणच नक्षल चळवळीसाठी अत्यंत घातक ठरत आहे. जंगलात सुरक्षा दलांचे जड ठरत असलेले पारडे नक्षल चळवळीच्या उठल्याप्रमाणे आहे. सुरक्षा दल व नक्षलवाद्यांच्या चकमकींचा इतिहास पाहता, नेमका इथेच प्रत्युत्तराचा धोका निर्माण झाला आहे. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षावर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण होतो, त्यावेळी तो पक्ष शांत राहतो. गमावलेली शक्ती मिळविण्याच्या प्रयत्नात असतो. अंतर्गत तयारी सुरू असते. वरकरणी शांतता दाखवली जाते. कोणत्याही प्रकारची आक्रमकता दाखवली जात नाही. अचानक सर्व दबाव झुगारून दिला जातो अन् मोठा हल्ला केला जातो. हा अत्यंत भीषण आणि क्रूर हल्ला असतो. यामागील उद्देश पुन्हा वर्चस्व स्थापन करण्याचा असतो. अलिकडच्या काळातील घडामोडी पाहिल्यास, तसा धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे. अर्थात् सरकारी पातळीवरून सर्वच प्रकारांची सतर्कता बाळगली गेली, तर हा धोका कमी होऊ शकतो.
 
 

Naxalite
 
Naxalite : मध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेसह २६ जणांचा खात्मा गडचिरोलीत करण्यात आला. तेव्हापासून नक्षलवादी सातत्याने बचावात्मक पावित्र्यात आले आहेत. त्यानंतर चकमकींमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची हानी झाली. सुरक्षा दल अत्यंत सजगपणे, चपळाईने आणि आक्रमकपणे परिस्थिती हाताळत असल्याने माओवाद्यांना काही प्रमाणात नमते घ्यावे लागत आहे. सुरक्षा दलाचा दबाव सातत्याने वाढत आहे. अशा अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमा दणक्यात सुरू आहेत. पण, त्या तुलनेत झारखंड आणि ओडिशातील नक्षलप्रभावी भागात नक्षलवादी कारवाया दिसत नाहीत. तिथे अचानक शांतता पसरली आहे. ही शांतता धोक्याची ठरू शकते. याआधी २०१९ मध्ये महाराष्ट्रात अशीच शांतता निर्माण झाली होती. दुर्दैवाने ती वादळापूर्वीची शांतता होती. येथे नक्षलवाद्यांनी अत्यंत क्रूर आणि भीषण हल्ला घडवून आणला होता. त्यांची ही कार्यपद्धती निश्चितच नवीन नाही. प्रत्युत्तराचा हा धोका कुठेही असू शकतो. तो महाराष्ट्रातही होऊ शकतो किंवा छत्तीसगडमध्येही.
 
 
अगदी झारखंड आणि काही प्रमाणात थंडावलेल्या ओडिशातही मोठा हल्ला होऊ शकतो. अशा प्रकारचा हल्ला होईलच, असे नाही. पण, सर्व शक्यता लक्षात सज्जता ठेवण्याची गरज आहे. नक्षलवादाविरोधातील लढाई निश्चितच सहजसोपी नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मागील पाच वर्षांत Naxalite नक्षलप्रभावी राज्यांमध्ये सुरक्षेसाठी जवळपास १६८५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. हा आकडा निश्चित लहान नाही. भारतातील माओवादी चळवळ मोठ्या प्रमाणात सामाजिक-आर्थिक परिस्थितीत खोलवर रुजलेली आहे. माओवादी संघर्षाचे अत्यंत गंभीर आर्थिक परिणाम तसेच देशावर होत आहे. माओवाद्यांमुळे वनवासींची वनउपज धोक्यात येते. हा अनुभव छत्तीसगड, झारखंडमध्ये आला आहे. माओवाद्यांमुळे सामाजिक, आर्थिक धोका निर्माण झाला आहे. तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात आहे. नक्षलवाद्यांमुळे तशीही सामाजिक वीण उसवली गेली आहे तसेच ग्रामीण भागातील अर्थकारणालाही त्यांच्याकडून धोका आहे. या सर्व धोक्यांवर मात करायची असल्यास नक्षलवाद्यांवर ठेवणे आवश्यक आहे. सुरक्षा दलाच्या वाढत्या दबावाचा सूड ते सामान्य वनवासींवरही घेऊ शकतात. त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. पण, सुरक्षा दलांची सज्जता, समर्पण असल्यास हा धोका उद्भवणार नाही, हे निश्चित 
 
- ९०२८५५१४१
Powered By Sangraha 9.0