- शरद पवार गटाचे नेते राहुल जगताप यांचा आरोप
मुंबई,
जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीमधून नवा वाद समोर येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या मध्यस्थीने श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तिकीट अनुराधा यांना विकले असल्याचा थेट आरोप श्रीगोंद्यातील शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार Rahul Jagtap राहुल जगताप यांनी केला. संजय राऊत यांनी ‘द्या खोके आणि उमेदवारी एकदम ओके’ असे सूत्र राबविले, असा थेट हल्ला त्यांनी केला.
ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर झाली आणि त्यात श्रीगोंदा येथून अनुराधा नागवडे यांना तिकीट दिल्याचे झाले. त्यामुळे आधीपासूनच दावा करीत आलेले Rahul Jagtap राहुल जगताप यांच्या वक्तव्याला बळ मिळाले. जगताप म्हणाले होते की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारी होती. मात्र, आता संजय राऊत यांनी ‘द्या खोके, उमेदवारी एकदम ओके’ असे सूत्र राबविले आहे, जे लोकशाहीला घातक आहे. शरद पवार माझे राजकारणातील श्वास अनेक अडचणी आल्या, पण त्यांची साथ सोडली नाही. शरद पवारांची श्रीगोंद्याच्या जागेबाबत काय अडचण होती, हे मला माहीत नाही. पण, माझा त्यांच्यावर कोणताही रोष नाही. त्यामुळे आता श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत काय करायचे, यासंदर्भात कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा आहे.
‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा देणारे संजय राऊत आणि त्यांच्या ठाकरे गटाचे मविआतील घटक पक्षांच्या नेत्यांचे शरद पवार गटाच्या माजी आमदाराने पितळ उघडे पाडले आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी अनेकवेळा खोके कोण घेते, मातोश्रीवर खोके कसे जातात, याबाबत सूतोवाच केले आहे. पण, यावेळी मविआतील बड्या नेत्याने संजय राऊतांनी खोके घेऊन विधानसभेची जागा विकल्याचा आरोप केल्याने, मविआ आणि ठाकरे गटासाठी अवघड जागेचे होऊन बसले आहे.